कल्याणच्या प्रसिद्ध उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा

कल्याणमधील प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांच्या विरोधात वीज वितरण कंपनीने वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे (case file against Kalyan famous builder Sanjay Gaikwad over power theft)

कल्याणच्या प्रसिद्ध उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा
उद्योजक संजय गायकवाड
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 12:35 AM

कल्याण (ठाणे) : कल्याणमधील प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांच्या विरोधात वीज वितरण कंपनीने वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीच्या आरोप त्यांचावर आहे. नुकतीच संजय गायकवाड यांनी 8 कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने ते चर्चेत आले होते. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या आरोपांप्रकरणी कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र, ही घटना शहरात चर्चेला कारण ठरली आहे.

वीज वितरण कंपनीची पोलीस ठाण्यात तक्रार

कल्याण पूर्व भागातील एका इमारतीत अनधिकृतपणे वीज पुरवठा सुरु असल्याची माहिती महावितरण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीचे अभियंता अशोक दुधे यांनी या इमारतीची पाहणी केली. या इमारतीत अनधिकृतपणे वीज पुरवठा सुरु असल्याचे आढळून आले. याबाबत 30 जूनला दुधे यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जवळपास 34 हजार 640 रुपये वीज चोरी झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वर्ग

वीज चोरीचा आरोप सुप्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावर हा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. संजय गायकवाड यांनी नुकतीच कोट्यावधी रुपयांची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने चर्चेत आले होते.

संजय गायकवाड यांची भूमिका काय?

याबाबत संजय गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली. “माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जी काही दंडात्मक कारवाई आहे. ती भरली जाईल. पूढील प्रक्रिया केली जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली. दरम्यान, एका सुप्रसिद्ध उद्योजकावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात हा विषय चर्चेचा कारण ठरला आहे (case file against Kalyan famous builder Sanjay Gaikwad over power theft).

हेही वाचा : खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार? प्रविण दरेकरांचा शिवसेनेला सवाल

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.