डोंबिवलीकरांनो, गर्दीचं काय घेऊन बसलाय? आता स्टेशनवरच सिनेमा पाहा; रेल्वेचा मोठा प्लान काय?

डोंबिवलीकरांसाठी एक खूश खबर आहे. आता डोंबिवलीकरांना रेल्वे स्थानकावर सिनेमा पाहता येणार आहे. त्यासाठी रेल्वेने एक मेगा प्लान तयार केला आहे. काय आहे हा प्लान?

डोंबिवलीकरांनो, गर्दीचं काय घेऊन बसलाय? आता स्टेशनवरच सिनेमा पाहा; रेल्वेचा मोठा प्लान काय?
Dombivli stationImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 1:44 PM

डोंबिवली | 23 सप्टेंबर 2023 : डोंबिवली हे प्रचंड गर्दीचं स्टेशन. कधीही जा. डोंबिवलीमधून लोकलमध्ये चढताना दमछाक होतेच. कारण कर्जत आणि कसाऱ्यावरून लोकल खचाखच भरून येतात. त्यामुळे डोंबिवलीतून लोकल पकडणं नको नकोसं होतं. सकाळी आणि संध्याकाळी तर विचारूच नका. डोंबिवली स्थानकात पाय ठेवायलाही जागा नसते. असं असलं तरी आता डोंबिवलीकरांना भर गर्दीतही आता सिनेमा पाहता येणार आहे. त्यासाठी रेल्वेने मेगा प्लान तयार केला आहे.

डोंबिवली स्टेशनवर आता प्रवाशांना चित्रपट पाहता येणार आहे. मध्य रेल्वेने सिनेडोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात ग्राहकांची गर्दी, गेस्ट, जेवण, नाश्ता, कोल्ड ड्रिंक्स याची या सिने डोममध्ये सुविधा असणार आहे. याशिवाय या सिने डोममध्ये नवनवीन चित्रपट, माहितीपट  प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था असणार आहे. म्हणजे प्रवाशांना एकाच ठिकाणी अनेक सुविधांचा एकाच वेळी लाभ घेता येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे.

या स्थानकांवर सिने डोम

मध्य रेल्वेने काही स्थानकावर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानाकंवर हा सिने डोम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना या स्थानकांवर सिनेमा पाहता येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या मिळकतीत भरही पडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

10 वर्षाचा कालावधी

प्री- फॅब्रिकेटेड सिने डोम ही तात्पुरती व्यवस्था असून त्याला कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कंत्राटदार स्वत:च सिने डोमचे व्यवस्थापन आणि ऑपरेटर करतील. 10 वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू उत्पन्न मॉडेल अंतर्गत असणार आहे. या स्थानकात 5 हजार चौरस फूट जागेत डोमची निर्मिती होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लाखो रुपये शुल्क भरावे लागणार

दरम्यान, ज्या संस्थांकडे या सिने डोमची जबाबदारी दिली जाईल, त्यांच्याकडून मध्य रेल्वे शुल्कापोटी लाखो रुपये वसूल करणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत आयतीच मिळकत होणार आहे. सिने डोमच्या माध्यमातून रेल्वेला महसूलाचा एक मार्ग मिळाला असून त्याला प्रवासी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.