सरकार कोरोनाला घाबरत नसून विरोधकांना घाबरतंय; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

कोरोनाच्या संकटामुळे राज्याचं विधीमंडळ अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. (chandrakant patil)

सरकार कोरोनाला घाबरत नसून विरोधकांना घाबरतंय; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 5:14 PM

पालघर: कोरोनाच्या संकटामुळे राज्याचं विधीमंडळ अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकार कोरोनाला घाबरत नसून विरोधकांना घाबरत आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil attacks Maharashtra Thackeray govt over Maharashtra Legislative assembly session)

चंद्रकांत पाटील आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. दोन दिवसाच्या अधिवेशनाने काय होणार आहे. किमान महिनाभरासाठी तरी अधिवेशन घेतलं पाहिजे. तरच जनतेच्या समस्यांवर चर्चा होईल. कोरोनाचं निमित्त पुढे करून अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेतलं जात आहे. ही सरकारची पळवाट आहे. हे सरकार कोरोनाला घाबरत नाही, तर विरोधी पक्षाला घाबरत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

म्हणून कारवाई होते

अविनाश भोसले यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांच्या जवळचे 500 कार्यकर्ते आहेत. त्या सर्वांवर कारवाई होत नाही. आर्थिक व्यवहारात ज्यांनी अनियमितता केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीच या संस्था आहेत, असं ते म्हणाले.

सत्तेचा फेविकॉल चिटकला

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरूनही पाटील यांनी आघाडी सरकारला टोला लगावला. सत्तेचा फेविकॉल इतका घट्ट चिटकला आहे की काही तरी मिळवण्यासाठी सर्वांचा खटाटोप सुरू आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

दोन दिवसांचे अधिवेशन

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. (chandrakant patil attacks Maharashtra Thackeray govt over Maharashtra Legislative assembly session)

संबंधित बातम्या:

Mumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज

सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? आक्रमक फडणवीस बैठकीतून बाहेर

(chandrakant patil attacks Maharashtra Thackeray govt over Maharashtra Legislative assembly session)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.