ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा
ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. (congress leader nana patole on corporation elections)
ठाणे: ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ठाण्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना पटोले यांनी हा इशारा दिला. (congress leader nana patole on corporation elections)
ठाणे काँग्रेसचे उपाध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कारण्यात आलेल्या कार्यक्रमाला नाना पटोले उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली. नोटबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची आर्थिक स्थिती बिकट केली आहे. मोदींनी काळा पैसा देशात आणणार होते. 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकणार होते. पण यापैकी काहीही झालं नाही. नोटाबंदी केल्यानंतर लोक रांगेत रांगा लावून मेले. पण खात्यात 15 लाख आलेच नाहीत. अडचणींचा सामना सामान्य जनतेने केला. भाजप सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
केंद्रावर हल्लाबोल
जीएसटी आल्यापासून हे पैसे कुणाच्या घरी गेले हे सर्वांना माहीत आहे. उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरले. सामान्य माणसाला त्याचा काहीच फायदा झाला नाही. कोविड काळात कायदा लावला. एकीकडे लस नाही. लस आणि ऑक्सिजन आधी मोफत होते. आता केंद्रामुळे तेही विकत घेण्याची वेळ आली आहे. ही वेळ आणण्याचं पाप मोदी सरकारने केलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
मदत साहित्याचं वाटप
बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली जाणार आहे. तसेच यावेळी तृतीय पंथीयांना रेशन किटचं वाटप करण्यात आलं. तसेच विकलांगांना व्हिलचेअरचं वाटप करण्यात आलं. या ठिकाणी किन्नर समाजाला मदत केली जात आहे. हाच मदतीचा हात विकलांगांनाही देण्यात आला आहे. केंद्र सरकार आपल्याला लस देत नाही. पण या ठिकाणी आपण लस खरेदी करून लोकांना मोफत देत आहोत. हा चांगला उपक्रम आहे. अनेक श्रीमंत लोक आपला वाढदिवस साजरा करतात. मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस होतो. पण काँग्रेस कार्यकर्ते वाढदिवसाच्या दिवशी लोकांना मदत करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले. (congress leader nana patole on corporation elections)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 July 2021 https://t.co/Uik3veHOCH #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 31, 2021
संबंधित बातम्या:
पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘मी चहावाला’, त्यांचे भाऊ प्रल्हाद म्हणाले, ‘ते चहावाले नाहीतच!’
बदलापूरहून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण, रस्त्यावर 10 फूट लांबीचे खड्डे, वाहन चालकांची कसरत
(congress leader nana patole on corporation elections)