Covid 19 : लसीकरणासाठी ठाण्याच्या ग्रामीण भागात ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा 1 जुलैपासून

Covid 19 : मिशन हर घर दस्तक -2 मोहिमेत 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तेथे लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Covid 19 : लसीकरणासाठी ठाण्याच्या ग्रामीण भागात 'मिशन हर घर दस्तक' मोहिमेचा दुसरा टप्पा 1 जुलैपासून
लसीकरणासाठी ठाण्याच्या ग्रामीण भागात 'मिशन हर घर दस्तक' मोहिमेचा दुसरा टप्पा 1 जुलैपासूनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 2:42 PM

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील (thane) शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा 1 जुलैपासून राबविण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी रेल्वे स्थानकांजवळ (railway station) लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी येथे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात कोरोना लसीकरणासाठीच्या जिल्हा कृती दलाची बैठक झाली. त्यावेळी डॉ. दांगडे यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी, तालुका आणि मनपा, नपा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी हे निर्देश देण्यात आले आहेत.

मिशन हर घर दस्तक -2 मोहिमेत 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तेथे लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. फ्रंट लाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील नागरिकांना पुरक डोस (प्रिकॉशन डोस) देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

लसीकरण केंद्रे किती?

ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी सध्या शासकीय आणि खासगी अशी एकूण 1021 लसीकरण केंद्र आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 13 जून अखेर संपूर्ण जिल्ह्यात पहिला डोस 70 लाख 30 हजार 950 (85 टक्के) तर दुसरा डोस 62 लाख 46 हजार (75 टक्के) नागरिकांनी घेतला आहे. 12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यंमध्ये पहिला डोस 1 लाख 41 हजार (44 टक्के) तर दुसरा डोस 75 हजार 270 (53 टक्के) असे लसीकरण झाले आहे.

तर गुन्हा दाखल करणार

जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शाळांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करून 100 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना डॉ. परगे यांनी दिल्या. लसीकरणा दरम्यान एखादी व्यक्ती संस्था अडथळा आणत असल्यास किंवा लसीकरणाविषयी गैरसमज पसरवित असल्यास त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.