ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा

ठाणे महापालिकेच्या बाळकुंम येथील कोविड रुग्णालयातून 500 हून अधिक कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे. (doctors, nurses agitation against thane covid hospital, who removed 500 workers)

ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा
COVID hospital protest
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 11:49 AM

ठाणे: ठाणे महापालिकेच्या बाळकुंम येथील कोविड रुग्णालयातून 500 हून अधिक कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या कामगारांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तर, रुग्णालयाची ही मोगलाई खपवून घेणार नाही, असं सांगतानाच या कामगारांना न्याय दिला नाही तर रुग्णालय चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. (doctors, nurses agitation against thane covid hospital, who removed 500 workers)

ठाणे महापालिकेच्या बाळकुंम या ठिकाणी कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयाने 500हून अधिक कामगाराना कामावरून कमी केल्याने संतप्त कामगारांनी कोविड रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अचानकपणे कामावरून कमी केल्याचा रोष या डॉक्टर, नर्स, बॉर्ड बॉय आणि कामगारांमध्ये दिसून येत आहे. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मनमानी सुरूच

यापूर्वीही कोविड रुग्णालयाने शेकडो कामगारांना कामावरून अचानक कमी केले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यामुळे या कामगारांना पुन्हा कामावर ठेवण्यात आले. मात्र आता तीच परिस्थिती समोर आलेली आहे. रुग्णालय प्रशासनाने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयाविरोधात सर्व कंत्राटी पद्धतीतील डॉक्टर, नर्स, कर्मचारी, वार्ड बॉय असे सर्वजण आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयाबाहेर जमले आहेत.

मनमानी खपवून घेणार नाही

दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर घटनास्थळी पोहोचले. दरेकर यांनी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका केली. कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या डॉक्टर, नर्स, वॊर्ड बॉय, कामगार अशा 500 हून अधिक लोकांना अचानकपणे कमी केल्याने कामगारांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. रुग्णालयाची ही मनमानी चालणार नाही. आम्ही अशी मनमानी खपवून घेणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला.

एजन्सी बोगस

ज्यांनी कोविड काळात जीव धोक्यात घालून योगदान दिलं. त्यांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडलं जात आहे. ही मोगलाई आम्ही खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास आम्ही हे रुग्णालयही चालू देणार नाही. एका एजन्सीने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. ओम साई आरोग्य सेवा ही एजन्सी बोगस आहे. यामागे कुणाचा आशीर्वाद आहे हे समोर आलं पाहिजे. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (doctors, nurses agitation against thane covid hospital, who removed 500 workers)

संबंधित बातम्या:

कोरोना काळातील भत्ता, अनेक मागण्या प्रलंबित, अंबरनाथमध्ये मनसेच्या कामगार सेनेचं आमरण उपोषण

आरक्षित भूखंडावर बांधलेली घरे खाली करा, 167 कुटुंबियांना फर्मान; 30 वर्षानंतर केडीएमसीला जाग

शिवसेनेच्या आमदार, महापौरांचा डम्पिंगविरोधात ठिय्या, पालिकेपासून राज्यापर्यंत सत्ता असतानाही आंदोलन

(doctors, nurses agitation against thane covid hospital, who removed 500 workers)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.