BREAKING : डोंबिवलीत 200 ते 250 नागरीक थेट रस्त्यावर उतरले, प्रचंड वाहतूक कोंडी, नेमकं काय घडलं?

डोंबिवलीत कल्याण शीळ रोडवर (Kalyan Shil Road) आज रात्रीच्यावेळी अचानक 200 ते 250 नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन पुकारलं. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

BREAKING : डोंबिवलीत 200 ते 250 नागरीक थेट रस्त्यावर उतरले, प्रचंड वाहतूक कोंडी, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 4:18 PM

ठाणे : डोंबिवलीत कल्याण शीळ रोडवर (Kalyan Shil Road) आज रात्रीच्यावेळी अचानक 200 ते 250 नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन पुकारलं. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या नागरिकांनी थेट रस्ता अडवून ठेवला. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अखेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित आंदोलक हे डोंबिवली पूर्वेतील शांती उपवन कॉम्प्लेक्समधील रहिवाशी आहेत. त्यांच्या इमारतीला तडा गेल्याने ते आज बेघर झाले आहेत. त्यांच्या इमारतीचं पाडकाम आता केडीएमसीकडून सुरु आहे. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी बिल्डरच्या विरोध रोष व्यक्त करत रास्ता रोको केलं.

या नागरिकांनी कल्याण शीळ रोडवर पलावा जंक्शन येथे रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनाच् लांबच लांब रांगा लागल्या. शांती उपवन कॉम्प्लेक्समधील एका विंगला तडा गेल्याने काल 240 कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. आपल्या राहत्या घराच्या प्रश्न निर्माण झाल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. बिल्डरने प्रत्यक्ष येवून घरांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी आहे. दरम्यान, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डोंबिवलीत शांती उपवन सोसायटीमध्ये रात्रीच्या सुमारास इमारतीला तडे जाऊन माती पडत असल्याची गोष्ट काही रहिवाशांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करायला सुरवात केली. काही नागरिक बाहेर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल, वॉर्ड अधिकारीसुद्धा दाखल झाले.

मारतीची माती पडत असल्याने इमारती राहणाऱ्या 250 कुटुंबाला पालिका अधिकारी व अग्निशामक दल कर्मचारी यांनी इमारतीच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. सध्या 250 लोक रस्त्यावर आली आहेत. पालिका प्रशासनाने त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र आता पुढे काय करायचं? असा प्रश्न या रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. रविवारी सुट्टीचा दिवस. मात्र सोमवारी मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुलांना शाळेत पाठवायचं कसं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, लोढा/मॅक्रोटेक डेव्हलपर्स लोढा/मॅक्रोटेक डेव्हलपर्सने यांही शांती उपवन ही इमारत विकसित केलेली नसल्याचे सांगत ही इमारत २० वर्षांपूर्वी विकसित झालेल्या ‘लोढा हेवन’ नावाच्या विकासाशी आमचा संबंध नसल्याचे सांगितलं आहे. आम्ही रहिवाशांशी सहानुभूती बाळगतो आणि मानवतावादी कारणास्तव आवश्यक असलेली कोणतीही मदत देण्यास तयार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे .

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.