ठाण्यात भीषण आग, बिझनेस पार्कची इमारत होरपळतेय, सिनेवंडर मॉलपर्यंत संकट धडकलं

ठाण्यात भीषण आगाची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग इतकी मोठी आहे की, तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत आग पोहोचलीय. आगीने शेजारी असलेल्या सिनेवंडर मॉललाही गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. या संकटावर मात करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ठाण्यात भीषण आग, बिझनेस पार्कची इमारत होरपळतेय, सिनेवंडर मॉलपर्यंत संकट धडकलं
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 10:00 PM

निखिल चव्हाण, Tv9 मराठी, ठाणे : ठाण्यातील सिनेवंडर मॉलला भीषण आग लागली आहे. खरंतर घोडबंदर रोडवर ओरियंटल बिझनेस पार्कमध्ये ही आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, या बिझनेस पार्कच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग भडकली आहे. तसेच ही आग सिनेवंडर मॉलपर्यंत पोहोचली आहे. मॉलच्या वरच्या मजल्यावर ही आग पोहोचली आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घोडबंदरला जोडणाऱ्या रसत्यावर आगीचे मोठे लोळ बघायला मिळत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जावानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

ठाण्यातील ओरियंटल बिझनेस पार्कला भीषण आग लागली आहे. पार्कच्या तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत ही आग पोहोचली आहे. ही आग नेमकी का लागली? आगीत होरपळून जीवितहानी झाली का? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या आगीमुळे खळबळ उडाली आहे.

रस्त्यावरील वाहतूक बंद

या बिझनेस पार्कमध्ये वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धाही होत असल्याची माहिती मिळत आहे. या बिझनेस पार्कच्या बाजूला सिनेवंडर मॉल आहे. या मॉलच्या वरच्या मजल्यावर ही आग पोहोचली आहे. आग प्रचंड मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच आगीच्या बाजूला कुणी जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. बिझनेस पार्कच्या मागच्या बाजूलादेखील भीषण आग लागली आहे.

हे सुद्धा वाचा

ही आग पसरत चालली आहे. त्यामुळे तिच्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल होत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पण ही घटना अतिशय भीषण आहे. घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.