दरड कोसळून पुन्हा एक मोठी दुर्घटना, ठाण्यात पाच जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखालून दोघांचे प्राण वाचवण्यात यश

ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात चार घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे.

दरड कोसळून पुन्हा एक मोठी दुर्घटना, ठाण्यात पाच जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखालून दोघांचे प्राण वाचवण्यात यश
ठाण्यात घरावर दरड कोसळली
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 6:01 PM

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. या दुर्घटनेत घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. बचाव पथकाने आतापर्यंत दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ते जखमी अवस्थेत आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पाऊस वैरी होऊन कोसळतोय. या मुसळधार पावसाने गेल्या 48 तासात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेकांचा बळी घेतला आहे. चेंबूरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती ठाण्याच्या कळवा शहरात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. एका घरावर दरड कोसळल्याने ते घर नेस्ताबूत झालं. ज्या नागरिकांनी ही घटना पाहिली त्यांच्यासाठी हा थरार शब्दांमध्ये सांगण अशक्य आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढलं आहे. पण आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जखमी नागरिकांची नावे :

1) प्रिती यादव (वय 5) 2) आचल यादव (18)

मृतकांची नावे :

1) प्रभू सुदाम यादव (वय 45)

2) विद्धवतीदेवी प्रभू यादव (वय 40)

3) रवीकिशन यादव (वय 12)

4) सीमरन यादव (वय 10)

5) संध्या यादव (वय 3)

संबंधित बातमी :

Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट, कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुसळधार सुरुच

बदलापूरजवळच्या कोंडेश्वर धबधब्याने धडकी भरवली, तुफान पावसाने रौद्ररुप 

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.