रस्त्याच्या पलिकडचा बॉल पकडण्याचा प्रयत्न, कचऱ्याच्या ट्रकने चिमुकल्याला चिरडलं

कल्याणमध्ये दुर्देवी घटना समोर आली आहे. रस्त्यावर खेळताना एक 12 वर्षाच्या चिमुरडा कचरा उचलणाऱ्या ट्रकच्या खाली सापडून चिरडला गेला. मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे (garbage truck crushes 12 year old child).

रस्त्याच्या पलिकडचा बॉल पकडण्याचा प्रयत्न, कचऱ्याच्या ट्रकने चिमुकल्याला चिरडलं
कचऱ्याच्या ट्रकने चिमुकल्याला चिरडलं
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 6:57 PM

ठाणे (कल्याण) : कल्याणमध्ये दुर्देवी घटना समोर आली आहे. रस्त्यावर खेळताना एक 12 वर्षाच्या चिमुरडा कचरा उचलणाऱ्या ट्रकच्या खाली सापडून चिरडला गेला. मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वसामान्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गाडी चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे (garbage truck crushes 12 year old child).

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर परिसरात ही दुदैवी घटना घडली. दुपारच्या सुमारास मोहन सृष्टी कॉम्पलेक्ससमोर काही लहान मुले क्रिकेट खेळत होती. त्यापैकी एक लहान मुलगा 12 वर्षाचा अमित धाडक बॉलच्या मागे रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेला. त्या दरम्यान कचरा उचलणारा ट्रक मागच्या दिशेने येत होता. मुलगा बॉल घेण्याच्या नादात होता. या दरम्यान तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला. त्यात तो चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला (garbage truck crushes 12 year old child).

पोलीसही घटनास्थळी दाखल

संबंधित घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरीकांनी धाव घेतली. तसेच पोलीसही दाखल झाले. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रक चालकाला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : 12 ऊसतोड मजूर तब्बल दोन वर्ष बंधक, महिलेच्या चलाखीने सुटका, जालना ते सोलापूर थरार

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.