TMC : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन’
सदर मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना अल्बेंडाझोल ही एक गोळी देण्यात येणार आहे. 1 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना अंगणवाडीतून तर, 6 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशकाची गोळी सर्व शासकीय अनुदानित शाळा, खाजगी अनुदानित शाळा, आश्रम शाळा, तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये देण्यात येणार आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागा (Department of Public Health)मार्फत 25 एप्रिल,2022 ते 2 मे 2022 या कालावधीत राष्ट्रीय जंतनाशक मोहिम (National Deworming Campaign) राबविण्यात येणार असून बालकांचे आरोग्य, त्यांची पोषणविषयक स्थिती, जीवनाचा दर्जा सुधारावा यासाठी 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा जंतनाशकाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये सर्व शासकीय अनुदानित शाळा, महापालिका व खाजगी अनुदानित शाळा तसेच 1 ते 19 वर्षे या वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या बालकांमध्ये जंतनाशकाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जंताचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने अस्वच्छता व दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे राऊंड वर्म, व्हिप वर्म व हुक वर्म ह्या प्रकारातील जंतांचे प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांमध्ये कुपोषण व रक्तशय होऊन त्यांना कायम थकवा जाणवतो. परिणामी त्यांची शारीरीक वाढ व मानसिक विकास पुर्णतः होत नाही. म्हणूनच ठाणे महापालिका परिक्षेत्रात ही जंतनाशक मोहीम मोठ्या प्रमाणात रावबण्यात येणार आहे. (Health Department of Thane Municipal Corporation organizes National Deworming Campaign)
जंताचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन
सदर मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना अल्बेंडाझोल ही एक गोळी देण्यात येणार आहे. 1 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना अंगणवाडीतून तर, 6 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशकाची गोळी सर्व शासकीय अनुदानित शाळा, खाजगी अनुदानित शाळा, आश्रम शाळा, तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये देण्यात येणार आहे. जंताचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाय नागरिकांनी अंमलात आणावे. यामध्ये उघड्यावर शौचास बसू नये, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छ पाण्याने फळे, भाज्या धुवाव्यात व मगच खाव्यात. नेहमी स्वच्छ पाणी प्यावे, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत, नखे स्वच्छ ठेवावीत व नियमित कापावीत. पायात बुट, चप्पल नेहमी घालावे, जेवणाआधी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत आदी उपाय नागरिकांनी अंमलात आणावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सदर मोहिमेमध्ये 25 एप्रिल, 2022 ते 2 मे 2022 या कालावधीत महापालिकेतील शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. या मोहिमेमध्ये नागरिकांनी आपल्या घरातील 1-19 वर्षातील सर्व लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी आवश्य द्यावी. ज्या लाभार्थ्यांनी 25 एप्रिल, 2022 रोजी काही अपरिहार्य कारणास्तव गोळी न घेतल्यास त्यांनी 29 एप्रिल, 2022 रोजी मॉपअप दिनी ही गोळी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Health Department of Thane Municipal Corporation organizes National Deworming Campaign)
इतर बातम्या