प्रवाशांचा रविवार खड्ड्यात! कल्याण-शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतू कोंडी; प्रवाशी वैतागले!
लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर आलेल्या पहिल्याच रविवारी अनेक लोक घराबाहेर पडले. त्यामुळे कल्याण-शीळ रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. (Heavy vehicles choke Kalyan-Shil road)
कल्याण: लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर आलेल्या पहिल्याच रविवारी अनेक लोक घराबाहेर पडले. त्यामुळे कल्याण-शीळ रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. पावसाचा जोर, खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक कोंडीत तास न् तास बसावे लागल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले होते. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर घराबाहेर पडलेल्यांचा पहिलाच रविवार खड्ड्यात गेला. (Heavy vehicles choke Kalyan-Shil road)
कल्याण-शीळ रोडवर होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे अक्षरश: हाल होत आहेत. निगरगठ्ठ प्रशासनामुळे सर्व सामान्यांची पिळवणूक होत आहे. विधानसभा सुरू नाही. पत्र व्यवहाराला उत्तर मिळत नाही. बैठका लावल्या जात नाही. कुणाला सांगायचे? असा संतप्त सवाल भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे मनसे आमदार राजू पाटील आणि रविंद्र चव्हाण हे पलावा सिटीत राहत असल्याने त्यांनाही दररोज या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
प्रशासन निगरगठ्ठ
कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणचे काम प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी रस्ता डांबराचा आहे. हा रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेषत: जुन्या काटई रेल्वे उड्डाणपूलाची गेल्याच वर्षी दुरुस्ती करण्यात आली. मात्र याच पुलावर खड्डे पडले आहेत. त्याच्या पूढे लागून पलावा जंक्शन आहे. त्याठिकाणी वाहतूक कोंडी होते. आजही या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांजी जोरदार टीका केली आहे. प्रशासनाकडे वारंवार पत्र व्यवहार केला आहे. रस्त्यालगत नैसर्गिक प्रवाह नाही. त्यामुळे केलेले रस्त्याचे काम वाहून जाते. आ परिसरात निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे त्यामुळे अर्धा किलोमीटरच्या प्रवासाकरीता 45 मिनिटांचा वेळ लागत आहे. विधानसभा सुरू नाही. पत्र व्यवहाराला उत्तर मिळत नाही. बैठका लावल्या जात नाहीच. निगरगठ्ठ प्रशासनामुळे सर्व सामान्यांची पिळवणूक होत आहे, असं चव्हाण म्हणाले.
वाहतूक कोंडीपासून स्वातंत्र्य कधी मिळेल?
कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा प्रशासनाला धारेवर धरले होते. कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना स्वातंत्र्य कधी मिळेल? सूचना करूनही काही फरक पडत नाही. ठेकेदार टक्केवारी दिल्यामुळे सुस्त आणि वाहतूक पोलिस हप्ते घेण्यात मस्त आहे, अशी घणाघाती टीका पाटील यांनी ट्विटरवरून केली होती. (Heavy vehicles choke Kalyan-Shil road)
VIDEO: MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 August 2021https://t.co/7POFZnmfmb#MahafastNews100 #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2021
संबंधित बातम्या:
आता उणे तिथे ठाणे असे म्हणावे लागेल… एकनाथ शिंदेंकडून पालिका कर्मचाऱ्यांचं भरभरून कौतुक
बदलापुरात शिवसेनेकडून सर्वात मोठी लसीकरण मोहीम, आतापर्यंत 17 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण
(Heavy vehicles choke Kalyan-Shil road)