कल्याण-डोंबिवलीतील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

नवी मुंबई, पनवले आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आपल्या भागातील शांळांना सुट्टी जाहीर केली आहे. ९ जुलै रोजी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवलीतील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 10:22 PM

कल्याण डोंबिवली परिसरातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानंतर महानगरपालिकेने सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, नवीमुंबई आणि ठाण्यासह अनेक भागात ९ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार सुरु आहे.

अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने ९ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर कोकणात रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबईत झालेल्य़ा पावसामुळे अनेक ठिकाणी रुळावर पाणी साचले होते. रुळावर पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होता. आता 9 जुलै रोजी देखील पावसाचा अलर्ट दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

याआधी नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेन देखील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. सानपाडा मार्केट परिसरात पाणीच पाणी दिसत आहे. नवी मुबंईतील काही सखल भागात देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभाग यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ. 1 ली ते 12 वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना दि. 9 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.