IND vs PAK, T20 World Cup 2021: भारत-पाक आज भिडणार; ‘जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा’च्या घोषणांनी ठाण्याचं सेंट्रल मैदान दणाणलं

भारत-पाकिस्तान दरम्यान आज टी-२० विश्वचषक स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना होणार आहे. बऱ्याच वर्षानंतर हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने या सामन्यांकडे संपूर्ण आशिया खंडाचं लक्ष लागलं आहे. (ICC T20 World Cup: Fans cheer up for Indian, Pakistani teams ahead of match in thane)

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारत-पाक आज भिडणार; 'जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा'च्या घोषणांनी ठाण्याचं सेंट्रल मैदान दणाणलं
ICC T20 World Cup
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 12:38 PM

ठाणे: भारत-पाकिस्तान दरम्यान आज टी-२० विश्वचषक स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना होणार आहे. बऱ्याच वर्षानंतर हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने या सामन्यांकडे संपूर्ण आशिया खंडाचं लक्ष लागलं आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये तर या सामन्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ठाण्याच्या सेंट्रल मैदानात तर क्रिकेटप्रेमींनी भारत माता की जय आणि जीतेगा भाई जीतेगा. इंडिया जीतेगाच्या घोषणांनी दणाणून सोडलं आहे.

तब्बल पाच वर्षाच्या नंतर भारत-पाकिस्तान टी-ट्वेन्टी ही मॅच होणार आहे. या सामन्याकडे सर्व जगाचं लक्ष लागेल आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानला भारतीय संघ पराजीत करणार आणि मोठ्या प्रमाणात एकदा पुन्हा जल्लोष होणार असल्याचं ठाण्यातील क्रिकेटप्रेमी सांगत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा यांची फटकेबाजी बघायला एक वेगळंच महत्त्व असणार आहे. त्यातच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा देखील मोठा अनुभव संघाला लाभणार आहे.

उत्सुकता शिगेला

आज मोठ्या प्रमाणात उत्सुकता देखील नागरिकांमध्ये असणार आहे. आता कोण कशी बाजी मारणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. ठाण्यातील सेंट्रल मैदानात भारत माता की जय… जीतेगा भाई जीतेगा इंडिया जीतेगा… अशा घोषणा आता क्रिकेटप्रेमीकडून होताना दिसत आहेत.

बशीर चाचा दुबईत

भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघ जेव्हा भिडतात तेव्हा टीव्ही फोडण्यावरुन मिम्स, मेसेजस पाहायला मिळतात. कारण विश्वचषक स्पर्धेक भारताने पाकिस्तानला अनेकदा धूळ चारली आहे आणि त्यानंतर पाकिस्तानात अनेक ठिकाणी तिथल्या क्रिकेट चाहत्यांनी टीव्ही फोडण्याचे प्रकार केले आहेत. याच टीव्ही फोडण्यावरुन भारतीय चाहते पाकिस्तानी फॅन्सना नेहमी डिवचत असतात. आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीसाठी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते दुबईला पोहोचत आहेत. आजच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचे बशीर चाचा देखील शिकागोहून दुबईला पोहोचले आहेत, तर भारतातील भारतीय संघाचे मोठे चाहते सुधीर गौतम देखील दुबईला गेले आहेत.

कधी आणि कुठे पाहता येईल हाय व्होल्टेज सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 विश्वचषकातील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल, 7 वाजता नाणेफेक होईल. टीम इंडियाचा टी 20 विश्वचषक 2021 पाकिस्तान विरोधातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्हाला भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेच मॅचचे अपडेटस मिळतील. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या www.tv9marathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. या मॅचचे ऑनलाईन लाॉईव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहू शकता.

संबंधित बातम्या:

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

India vs Pakistan, T20 World Cup LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

(ICC T20 World Cup: Fans cheer up for Indian, Pakistani teams ahead of match in thane)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.