रिक्षाचालकांपासून ते उद्योजकांपर्यंतच्या असामींचं रक्तदान; कल्याणमधील अनोख्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद
कल्याणमध्ये आगळेवेगळे आणि अनोखे रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात रिक्षाचालकांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांनी भाग घेतला. सकाळपासून सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात सर्व जातीधर्माच्या लोकांनी या शिबिरात भाग घेतला.
कल्याण: कल्याणमध्ये (kalyan) आगळेवेगळे आणि अनोखे रक्तदान शिबीर (blood donation camp) पार पडले. या रक्तदान शिबिरात रिक्षाचालकांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांनी भाग घेतला. सकाळपासून सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात सर्व जातीधर्माच्या लोकांनी या शिबिरात भाग घेतला. या रक्तदान शिबिरात दिवसभरात तब्बल 275 जणांनी भाग घेतला. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांमध्ये तरुणींनीही सहभाग घेतला होता. तसेच, रक्तदान हे जगातील श्रेष्ठदान असं म्हटलं जाते आणि रक्ताला कोणताही जात-धर्म नसतो. कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणने (indian medical association) नेमका हाच संदेश दिला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची कल्याणमध्ये जोरदार चर्चा होत आहे. तसेच हे शिबिर आयोजित करणाऱ्या आयोजक आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचेही अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज भासते. त्यावेळी त्याला रक्त चढवताना ते कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा आहे हे पाहिले जात नाही. कोणत्या जातीच्या माणसाने रक्त दिले हे पाहिले जात नाही. तर केवळ त्याचा रक्तगट तपासून गरजू व्यक्तीला रक्त चढवले जाते. जात आणि धर्म या सर्वांपेक्षा आपण सर्व जण भारतीय आहोत हे महत्वाचे आहे. याच संकल्पनेतून आणि हाच एकतेचा संदेश देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हे रक्तदान शिबीर घेण्यात आल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.
आयुक्तांची उपस्थिती
कल्याण पश्चिमेच्या स्प्रिंगटाइम क्लब सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल 275 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ज्यामध्ये सामान्य रिक्षाचालकांपासून ते बड्या उद्योजकापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश होता. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्या प्रमूख उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
या डॉक्टरांनी घेतला भाग
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सचिव डॉ. ईशा पानसरे, खजिनदार डॉ. सुरेखा इटकर यांच्यासह डॉ. अश्विन कक्कर, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. राजेश राघवराजू, डॉ. हिमांशू ठक्कर, डॉ. सोनाली पाटील आदी टीमने विशेष मेहनत घेतली.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 January 2022 -TV9https://t.co/NcDcdP6pF6#News | #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2022
संबंधित बातम्या:
चाकू दाखवूनही हिंमतबाज महिलेची चोराशी झुंज, अख्खी टोळी गजाआड; धावत्या एक्सप्रेसमध्ये थरार!
महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; 2 फेब्रुवारीला रणनीतीवर काथ्याकूट, भाजपसोबत जाणार का?