‘पतीला घराबाहेर पडायाला परवानगी नाही’, आमदार पित्यासमोरच लेकीने उद्विग्नता मांडली, कुणीच मदत करत नसल्याची तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या मुलीने आपल्या पित्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुलीने पित्यासमोर आपल्या जीवाला धोका असून सुरक्षेची कुणी काळजी घेत नाही, अशी उद्विग्नता व्यक्त केलीय.

'पतीला घराबाहेर पडायाला परवानगी नाही', आमदार पित्यासमोरच लेकीने उद्विग्नता मांडली, कुणीच मदत करत नसल्याची तक्रार
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 6:51 PM

ठाणे : ठाण्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील बडे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक उपायुक्तांना मारहाण केलीय. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या वादामागे सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आणि त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विशेष म्हणजे नताशा यांनी आज वडील जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण पोलीस ठाण्यात तक्रार केली पण आपली दखल घेतली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली.

संबंधित ऑडिओ क्लिपमुळे आपल्या कुटुंबात कशी खळबळ उडालीय याबद्दल नताशा यांनी प्रतिक्रिया दिलीय. संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आपल्या सासरची मंडळी खूप घाबरले आहेत. सासरच्यांकडून आपल्या पतीला घराबाहेर पडण्यास परवानगी नाकारली आहे, असं नताशा यांनी सांगितलंय.

हे सुद्धा वाचा

“मी राजकारणात नाहीय. पण मला राजकारणात खेचलं जातंय. मला इथे पत्रकार परिषदेत यावं लागतंय. कारण आम्हाला कुणीच मदत करत नाहीय. माझ्या पतीचं कुटुंब तर राजकारणात अजिबात नाहीय. माझ्या कुटुंबियांनी पतीला घराबाहेर निघण्यासाठी परवानगी दिलेली नाही. सगळे खूप घाबरलेले आहेत”, अशी उद्विग्नता नताशा यांनी आपल्या वडिलांसमोर व्यक्त केली.

‘तक्रार करुनही सुरक्षा पुरवली नाही’

“दोन दिवसांपूर्वी ती ऑडिओ क्लिप व्हारल झाली तेव्हा मी आणि माझ्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पण ठाणे पोलिसांनी आमची तक्रार घेतलेली नाही. याशिवाय आम्हाला कोणतीही सुरक्षा पुरवली गेलेली नाही. अधिकाऱ्याला ज्युपिटरमधून डिसचार्ज मिळाला आहे. आमच्या सुरक्षेची कोण काळजी घेत आहे?”, असा प्रश्न नताशा यांनी उपस्थित केला.

नताशा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा केला उल्लेख

“कुणीही आम्हाला मदत करत नाहीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा देणार असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांनीदेखील अजून सुरक्षा पुरवलेली नाही. आम्ही कुठे जायचं? आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात एक मिनिटात तक्रार घेऊन कारवाई केली. पण जे ऑडिओ क्लिपवरुन झालंय त्या बद्दल मी पोलीस ठाण्यात गेले, आमच्या जीवाला धोका आहे, असं सांगितलं. पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही”, असं नताशा यांनी सांगितलं.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.