महाराष्ट्रातल्या एका पक्षाचा नेता जेव्हा बाप म्हणून अस्वस्थ होतो, मुलीला जीवे मारण्याच्या धमकी, जितेंद्र आव्हाड भावनिक

"ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही. किंवा ओरडलोही नाही. तिच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते", असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

महाराष्ट्रातल्या एका पक्षाचा नेता जेव्हा बाप म्हणून अस्वस्थ होतो, मुलीला जीवे मारण्याच्या धमकी, जितेंद्र आव्हाड भावनिक
जितेंद्र आव्हाडImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 11:11 PM

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील बडे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलगी आणि जावायाला जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली. खरंतर आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली. संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरुन आव्हाडांच्या समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर संबंधित ऑडिओ क्लिपसह आपली भूमिका मांडली आहे.

“ज्या नताशाला मी तीच्या जन्मानंतर साधं बोटही कधी लावलं नाही. किंवा ओरडलोही नाही. तिच्याबद्दल एक व्यक्ती फिल्डींग लावून मारुन टाकेन हे बोलतो. तेव्हा प्रचंड राग येतो. अस्वस्थता येते”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“तुम्हीच मला सांगा एक राजकीय नेता म्हणून हे सगळं सहन करायचं. एक पिता म्हणून हे सगळं सहन करायचं. आणि भूमिका काय घ्यायची? घाबरुन घरी बसायचं, का उघडपणाने मैदानात यायचं?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“कोण आहे बाबाजी? बाबाजी म्हणजे दाऊद इब्राहिमचा हस्तक. जे जे हत्या शुटआऊटमधील पहिल्या पाच जणांमधील एक आरोपी. स्वत:चं मुंबईमध्ये प्रचंड नाव असलेला”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“त्याच्या हस्तकांकरवी जावयाचा आणि मुलीचा मर्डर होणार. हे ऐकल्यानंतर एका बापाला काय वाटलं असेल? राजकारण बाजूला ठेवा. पण, कधीतरी ह्या गोष्टीचा देखील विचार करा”, अशी भावनिक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर दिलीय.

संबंधित कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काल भूमिका मांडली होती. “तो स्वत:च्या तोंडाने कबूल करतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “एक गोष्ट मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल पाहिली की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार, असं तो क्लिपमध्ये बोलतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

“मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलंय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.

“माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे, मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जो जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“बाबाजीच्या नावावर खूप गुन्हे आहेत. तसा तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या जीवावर हे सगळं शूटर्सचं प्लॅनिंग करतोय, हे तो बोलून दाखवतोय. नंतर म्हणतोय मी बाबाजींचं काम करणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे त्याला लगाम घातला गेला नाही तर गैरकृत्यातून जमवलेली पैशांची थैली त्याने डोकं जड व्हायला लागतं. स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत हे काय बोलणं झालं काय?”, असा सवाल त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.