AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन महाराष्ट्राला वेठीस धरलं, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाना

काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन महाराष्ट्राला वेठीस धरलं, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाना
जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 7:31 AM
Share

ठाणे(भिवंडी) : राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसटी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले.भाजपाच्या नेत्याने शरद पवार का मध्ये पडतात त्यांच्या घरी का बैठका होतात, असा सवाल केला होता? यास आपण त्या ट्विट च्या माध्यमातून उत्तर दिल्याचे आव्हाड यांनी सांगितले. काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

शरद पवार 40 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवतात

गेल्या 40 वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले. ऊसतोड कामगारांचा संप झाला त्यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांच्या मागण्या घेऊन पवार साहेबांकडे यायचे. पवारसाहेब त्यांचे प्रश्नदेखील मिटवायचे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

विडी कामगारांचा संप झाला त्यावेळी देखील नरसय्या आडम व शरद पवार बसून प्रश्न सोडयचे. परंतु, यावेळी उगाचच काही नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतला आणि त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोललो. काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केलं. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या असून फक्त विलीनीकरणाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. मात्र, काही राजकीय नेते एसटी कर्मचाऱ्यांचे फसवणूक करतात, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट

भिवंडीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षपदी शोएब खान गुड्डू यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयाची उभारणी केली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे भिवंडी शहरात आले होते. यावेळी भिवंडीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रांजनोली नाका ते कार्यालय येथपर्यंत मोठी बाईक रॅली काढून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली, या रॅलीमध्ये शेकडो बाईक सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम स्थळ कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. कोरोना नियंत्रणात आला असला तरीही शासनानं जे नियम कोरोना संसर्गाबाबत घालून दिले आहेत त्या नियमांची पायमल्ली कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात आली..

इतर बातम्या:

दक्षिण भारतात Red Alert, सलग 26 दिवस पावसाचा कहर, नोव्हेंबरमध्ये भारतात 143% जास्त पाऊस

Arjun Khotkar | शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या कचाट्यात, अर्जुन खोतकरांची तब्बल 18 तास चौकशी

Jitendra Awhad slam BJP leaders over ST Workers Strike

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.