Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवली महानगरपालिका ॲक्शन मोडवर, केडीएमसीचा दूरध्वनी झाला रिचेबल
राज्यात मुसळधार पाऊस मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईसह शेजारच्या इतर शहरात देखील मुसळधार पाऊस झाला.
कल्याण – कल्याण शहरातील (Kalyan City) खड्डे बुजविण्यासाठी 15 कोटी 15 लाख रुपये खर्चून 13 ठेकेदारांची (Contractor) नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून अधिकृत दूरध्वनी क्रमांक देत यावर नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र शनिवारी रविवारी तांत्रिक बिघाडामुळे टोल फ्री नं नॉट रिजेबल झाल्याने नागरिक संतप्त झाल्याची बातमी प्रसिध्द झाली. त्यानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर येत तात्काळ टोल फ्री नं सुरू केले. या टोल फ्री नंबर वरती तक्रारींचा पाऊस पडत आहे . आतापर्यंत 247 तक्रारी या टोल फ्री (Toll Free) नंबर वरती प्राप्त झाल्याअसून यामधील सुमारे 150 तक्रारीची दखल घेत 13 ठेकेदारांच्या माध्यमातून 24 तास काम करत दर दिवशी जवळपास 1500 ते 2000 चौ.मी.खड्डे भरत असल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.
पालिकेच्या ॲक्शन मोडवर नागरिक ही संतुष्ट
विशेष म्हणजे हे खड्डे भरत असताना ठेकेदार सोबत संबंधित पालिका अधिकारी रस्त्यावरती उतरलेले दिसून आले आहेत. पावसामुळे खड्डे बुजवताना अडचणी येत आहेत. तरी कोल्ड मिक्स,पेव्हर ब्लॉक, खडीकरण व रेडीमिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याची कामे युद्ध पातळी वर सुरू करण्यात आली आहेत. तर पालिकेच्या ॲक्शन मोडवर नागरिक ही संतुष्ट झाले असून नागरिकांनी आनंद व्यक्त करत कामाची गती वाढवून खड्डे मुक्त कल्याण डोंबिवली करण्याची विनंती पालिका आयुक्ता कडे केली आहे.
चोवीस तासात 1500 ते 2000 चौ.मी.खड्डे भरत असल्याचा दावा
राज्यात मुसळधार पाऊस मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईसह शेजारच्या इतर शहरात देखील मुसळधार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे मुख्य रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. कल्याण आणि डोंबिवली शहरात देखील मागच्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात खडे झाले आहेत. नागरिक पालिकेच्या दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरती तक्रारी दाखल करीत आहेत. मागच्या चोवीस तासात 1500 ते 2000 चौ.मी.खड्डे भरत असल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे.