फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची महिलेशी हुज्जत, राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन चोपलं

कल्याणमध्ये महिलेशी हुज्जत घालणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला (Kalyan MNS party workers beat Finance company employee)

फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याची महिलेशी हुज्जत, राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन चोपलं
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 4:06 PM

कल्याण (ठाणे) : एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत उद्धट भाषेत आरेरावी केली. इतकेच नाही तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन त्याला माफी मागण्यास भाग पाडले आहे (Kalyan MNS party workers beat Finance company employee).

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली परिसरात आर. एल. बी.  या फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेतून एका महिलेने लोन घेतले होते. वारंवार या महिलेला इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी फोन केला जात होता. महिला आपली व्यथा मांडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या शाखेत पोहचली. याठिकाणी तिला कर्मचारी अनील भोगे यांनी आरेरावी केली.

महिलेची मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार

महिलेशी बोलत असताना य कर्मचाऱ्याने राज ठाकरे आले तरी काही फरक पडणार नाही, असं म्हटलं. महिलेने ही बाब मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितली. मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे, विद्यार्थी सेना, महिला सेना पदाधिकारी इतर कार्यकर्ते तिथे पोहचले. त्यांनी अनील भोगेला या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्याला उठाबशा काढायला लावून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना 23 फेब्रुवारीला संध्याकाळी घडली होती. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका काय?

“कोरोनाचा काळ आहे. या काळात सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. फायनान्स कंपनीवाले अतिमुजोरपणे लोकांना त्रास देत आहेत. संबंधित महिलेने आम्हाला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. राज ठाकरे यांचं नाव घेण्याचं काही कारणच नव्हतं. त्याची लायकीच नाही. त्यामुळे आम्ही त्याला मनसे स्टाईल धडा शिकवला”, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी उदय वाघमारे यांनी दिला (Kalyan MNS party workers beat Finance company employee).

मनसेची खळखट्याक स्टाईल

काही दिवसांपूर्वी वाशी टोलनाक्यावर एका वाहनचालकाशी हुज्जत घालणाऱ्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावेळी देखील मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला चोपले होते. मनसे कार्यकर्त्यांनी याआधी देखील अशा अनेक लोकांना चोपले आहे. मनसेची खळखट्याक ही सर्वश्रूत अशी स्टाईल आहे. त्यांच्या स्टाईलमुळे अनेकांना नमतं घ्यावं लागल्याचं याआधी देखील महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलं आहे.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.