रेल्वे स्टेशनवर सहा महिन्यांच्या बाळाची चोरी, सीसीटीव्हीच्या आधारावर टोळी गजाआड, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

कल्याण स्टेशन परिसरातून बाळाची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे (Kalyan Police arrest burglars who stolen six-month-old baby at Kalyan railway station).

रेल्वे स्टेशनवर सहा महिन्यांच्या बाळाची चोरी, सीसीटीव्हीच्या आधारावर टोळी गजाआड, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 7:39 PM

कल्याण (ठाणे) : सहा महिन्यांचं बाळ जे काही बोलू शकत नाही, त्याची चोरी करुन त्यांना वाटलं की, कुणाला कानोकान खबर लागणार नाही. मात्र या चोरट्यांचा पर्दाफाश तिसरा डोळा असलेल्या सीसीटीव्हीने केला. कल्याण स्टेशन परिसरातून बाळाची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या चोरट्यांनी यापूर्वी अशाप्रकारे किती बाळांची चोरी केली? याचा तपास पोलीस करत आहेत (Kalyan Police arrest burglars who stolen six-month-old baby at Kalyan railway station).

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात बेघर असलेले अनेक दाम्पत्य रस्त्यावरच झोपतात. यापैकीच एक सुनिता राजकुमार नाथ ही महिला सहा मुलांना घेऊन झोपली होती. त्यापैकी तिचा सगळ्यात लहान असलेला सहा महिन्यांचा मुलगा जिवा याची चोरी झाली. सुनिताने आपली व्यथा महात्मा फुले पोलिसांना सांगितली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संभाजी जाधव, पोलीस अधिकारी प्रकाश पाटील, दीपक सरोदे आणि ढोले यांच्या पथकाने या  बाळाचा शोध सुरु केला (Kalyan Police arrest burglars who stolen six-month-old baby at Kalyan railway station).

पोलिसांनी कारवाई कशी केली?

सीसीटीव्हीत दोन चोरटे या बाळाला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यांचा गुन्हेगारीचा पूर्व इतिहास नसल्याने शोध घेण्यासाठी मोठे आव्हान होते. अखेर पोलिसांच्या कामी सीसीटीव्हीचे फूटेज आले. अखेर पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. आंबिवलीत राहणारा आरोपी विशाल त्र्यंबके आणि दिव्यात राहणारा आरोपी कुणाल कोट यांनी त्या बाळाची चोरी केली होती. हे दोघं सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहेत.

बाळाला कुणी विकत घेतलं?

काही दिवस हे बाळ आरोपी कुणाल कोट याच्या पत्नी आरतीकडे होते. त्यानंतर या बाळाला भिवंडीत राहणाऱ्या हिना मजीद आणि फरहान मजीद या जोडप्याला देण्यात आलं. या जोडप्याने दोघं तरुणांना बाळाच्या बदल्यात एक लाख रुपये देण्याचे ठरवले होते.

पोलिसांनी हिनाची जेव्हा चौकशी केली तेव्हा तिने उडवाउडवीचे अनेक उत्तरे दिली. सुरुवातीला तिने मुलगा नसल्याने त्याला दत्तक घेतल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे हिनाने याआधी टेस्टट्यूब बेबीने बाळाला जन्म देऊन साडे पाच लाख रुपयात विकलं होतं. यावेळी तिने टेस्टट्यूब बेबीचा प्रयोग न करता चोरलेल्या बाळ आयतंच खरेदी करुन विकायचे हे फरहान आणि हिनाने ठरविले होते. दोघे मुंबईत नेमकं कोणत्या दांपत्याला विकणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या : 

मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या, घटनेच्या दोन आठवड्यानंतर आरोपीचा कबुलीनामा!

रेखा जरे- बाळ बोठेचा ‘प्रेमाचा अँगल’, पुढे बदनामीच्या भीतीने हत्या, मुख्य सूत्रधार बाळ बोठेवर अखेर दोषारोपपत्र दाखल!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.