AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट

मुंबई, ठाण्यात कोरोनाने कहर केला असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण नियमांचं उल्लंघन करुन जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत (Kalyan Youths stunt on car during heavy rain)

VIDEO : एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट
एकाच्या हातात स्टेअरिंग, दोघांचं अर्ध धड बाहेर, तिसरा थेट पुढच्या काचेला लटकलेला, तरुणांचं जीवघेणं स्टंट
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 11:55 PM
Share

कल्याण : पहिल्याच पावसाने मुंबई आणि ठाण्याला झोडपून काढलं. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं, रेल्वे सेवा खंडीत झाली, काही ठिकाणी इमारतींच्या संरक्षण भिंत पडल्याने वाहनांचं नुकसान झालं. दुसरीकडे कोरोनाचं संकटही आहे. या साऱ्या गोष्टी ताज्या असताना कल्याणच्या मलंगगड परिसरातील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत काही तरुण रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालवत विचित्र आणि जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. या व्हिडीओकडे पाहिल्यानंतर संबंधित तरुणांना परिस्थितीचं खरंच गांभीर्य नाही, हे स्पष्टपणे जाणवतंय (Kalyan Youths stunt on car during heavy rain).

पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रस्त्यावर भर पावसात अशाप्रकारे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांना पोलीस रोखणार कधी? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातोय. संबंधित प्रकार हा कल्याण पूर्वेत शहरापासून लांब असलेल्या मलंगगड परिसरात घडला आहे. संबंधित परिसर हा हिललाईन पोलिसांच्या हद्दीत येतो. हिललाईन पोलीस लवकरच या प्रकरणी कारवाई करतील, अशी सर्वसामान्यांची आशा आहे (Kalyan Youths stunt on car during heavy rain).

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

व्हायलर होणाऱ्या व्हिडीओत रस्त्याने एक कार भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. या कारच्या पुढच्या काचेला लटकून एक तरुण बोनेटवर दोघे पाय ठेवून उभा आहे. एका तरुणाच्या हातात गाडीची स्टेअरिंग आहे. तर इतर दोन तरुण गाडीतील खिडकीतून बाहेर दरवाज्यावर बसले आहेत. तिघं मोठ्या आवाजात ओरडून जल्लोष करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी दोन तरुण स्कुटीवर आहेत. ते या संबंध प्रकाराचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध असाताना संबंधित प्रकार

विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात धरण परिसर, धबधबा किंवा नदी किनाऱ्यावर, घाट परिसर किंवा तलाव परिसरात जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. राज्यात कोरोनाचं संकट आहे, त्यात पावसाळ्यात तलाव, नदी, धरण किंवा धबधबा परिसरात जावून अनेक जण वाहून गेल्याच्या दुर्घटना याआधीच घडल्या आहेत. याशिवाय या परिसरांमध्ये शेकडो पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचं पालन होणार नाही. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्गही वाढू शकतो. त्यामुळेच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अशा परिसरात फिरण्यास बंदी घातली आहे. अशा परिसरांपासून एक किमी अंतरावर कोणत्याही वाहनास प्रवास करण्यास मनाई करण्यात आलं आहे. पण फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : ‘जीने के लिए सोचाही नहीं, दर्द सवारने होगे’ गाणं गात व्हिडीओ बनवला, नंतर अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.