केडीएमसीत दोन आणखी स्मशानभूमी उभारुन 24 तास सुरु ठेवणार, महापालिका आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काही दिवसांपासून कोरोना मृत्यूत वाढ झाली आहे (KDMC commissioner Vijay Suryawanshi big decision about cemetery).

कल्याण (ठाणे) : केडीएमसी क्षेत्रात स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांना होत असलेल्या त्रासाची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना दिली. यावेळी त्यांनी 24 तास स्मशानभूमी खुली ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीची आयुक्तांनी दखल घेत 24 तास स्मशानभूमी सुरु राहवी यासाठी कर्मचारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही ठिकाणी नवीन स्मशानभूमी तयार करण्याचे काम लवकर सुरु होणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे (KDMC commissioner Vijay Suryawanshi big decision about cemetery).
नेमकं प्रकरण काय?
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काही दिवसांपासून कोरोना मृत्यूत वाढ झाली आहे. स्मशानभूमीत शवदाहिनीवर अंत्यविधी करण्यात येत आहे. या शवदाहीनीची एक मर्यादा असते. त्यामुळे लाकडावर अंत्यविधी सुरु करण्यात आली आहे. लाकडावर अंत्यविधी केल्याने मृताच्या नातेवाईकांना चार ते पाच तास वाट पाहावी लागत आहे. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबात ‘टीव्ही 9 मराठी’ने बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांशी चर्चा केली.
आयुक्तांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 24 तास अंत्यसंस्कार करता यावा यासाठी कर्मचारी वर्ग वाढविला जाणार आहे. शवहादिन्याना दुरस्त करण्यात येणार आहे. नव्या स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रशासनाकडून मदत केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली आहे (KDMC commissioner Vijay Suryawanshi big decision about cemetery).
नव्या अध्यादेशावर आयुक्तांची प्रतिक्रिया
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राज्य सरकारने काढलेल्या नव्या अध्यदेशानुसार उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. किराणा दुकाने सात ते आकरा पर्यंत सुरु राहणार आहेत. दूध डेअरी चालक तीन वाजेपर्यंत घरपोहच सेवा देऊ शकतात. ज्यांचे दुकान आहे ते भाजी आाणि फळ विक्रेते तीन वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करु शकतात. तर ज्यांचा फिरतीचा धंदा आहे. त्यांना केवळ सकाळी 11 वाजेपर्यंत विक्री करता येणार आाहे.
खाजगी कोविड रुग्णालयांनी क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण घेऊ नयेत
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता नाही. सरकारने 250 इंजेक्शनचे डोस महापालिकेस उपलब्ध करुन दिले आहेत. खाजगी रुग्णालयांकडून माहिती मागविली जात आहे. अॅप व पोर्टलच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जात. तरीदेखील खाजगी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकाना इंजेक्शन बाहेर आणण्याची चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी दिली आहे,
खाजगी रुग्णालयांनाही नियमीत ऑक्सीनजचा पुरवठा होत आहे. तरी देखील उपलब्ध ऑक्सिजन पाहता क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण खाजगी रुग्णालयांनी दाखल करुन घेऊ नयेत. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन दिले जात आहे. आता उद्यापासून 70 आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे आयसीयू बेडची क्षमता वाढणार आहे. महापालिकेत 55 व्हेटींलेटर उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे व्हेंटीलेटर बेड्सची क्षमताही वाढणार आहे, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :