हिरेन हत्येप्रकरणी अटकसत्रं सुरूच राहणार; सोमय्या यांनी घेतली मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट
केंद्रातील मोदी सरकारमुळे एनआयएने मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास हातात घेतला. त्यामुळेच हिरेन कुटुंबीयांना न्याय मिळाला. तसेच या प्रकरणातील अटक सत्र सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. (kirit somaiya met mansukh hiren family at thane)
ठाणे: केंद्रातील मोदी सरकारमुळे एनआयएने मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास हातात घेतला. त्यामुळेच हिरेन कुटुंबीयांना न्याय मिळाला. तसेच या प्रकरणातील अटक सत्र सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. (kirit somaiya met mansukh hiren family at thane)
हिरेन कुटुंबीयांची मी आज भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. चार्जशीट दाखल केल्यामुळेच हिरेन यांच्या कुटुंबीयांना शांतता वाटत आहे. हिरेन यांना कसं फसवण्यात आलं हे यातून स्पष्ट झालं आहे. मोदी सरकारमुळे एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला. अन्यथा ठाकारे सरकार पोलिसांच्या माध्यमातून सुपारी देऊन हत्या करत होती, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
अटक सत्रं सुरूच राहणार
हिरेनप्रकरणी एनआयएचा तपास योग्यरितीने सुरू आहे. अजूनही अटक सत्र सुरू राहणार आहे, असा दावाही त्यांनी केला. मनसुखच्या कुटुंबीयांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत. अजूनही आरोपी बाहेर आहेत. त्यांना अटक करण्याची इच्छाही हिरेन यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं.
परमबीर सिंगकडून किती पैसे घेतले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या नियुक्तीसाठी किती पैसे घेतले हे अजून बाहेर आलेलं नाही. सरकार पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेत असून महाराष्ट्र हे सहन करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना निवडले आहे, असंही ते म्हणाले.
सोमय्यांना सुरक्षा
दरम्यान, सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल 40 CISF जवानांच्या सुरक्षेचं कवच असेल. सोमय्यांना Z दर्जाची (Z security) सुरक्षा असेल. महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरुद्ध वात पेटवली आहे. त्यानंतर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल.
दाऊदला बोलावलं तरी घाबरणार नाही
सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सोमय्या यांची बोलती बंद करा, असं ठाकरे सरकारचं म्हणणं आहे. माझ्यावर हल्ला झाला होता. तेव्हा माझ्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षक होते म्हणून माझा जीव वाचला. मी सुरक्षा मागितली नव्हती. केंद्राकडे आयबीचा तसा रिपोर्ट गेला म्हणून मला सुरक्षा मिळाली. हे सरकार घोटाळेबाज आहे. ठाकरे सरकार आणि शिवसेनेने कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला देखील आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (kirit somaiya met mansukh hiren family at thane)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 September 2021https://t.co/XVgPM59JzW#100Superfastnews #superfastnews #marathinews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2021
संबंधित बातम्या:
प्रताप सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा; सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
(kirit somaiya met mansukh hiren family at thane)