Kirit Somaiya: संजय राऊत का भी हिसाब होगा और संजय पांडे का भी; किरीट सोमय्यांचा इशारा

Kirit Somaiya: आता मला ट्विटरवरून धमकी आली आहे. उल्हासनगरला या, खार पेक्षा चांगली व्यवस्था करू. याची पोलिसांनी नोंद घ्यावी.

Kirit Somaiya: संजय राऊत का भी हिसाब होगा और संजय पांडे का भी; किरीट सोमय्यांचा इशारा
संजय राऊत का भी हिसाब होगा और संजय पांडे का भी; किरीट सोमय्यांचा इशारा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 1:05 PM

उल्हासनगर: अडीच लाख लोकांचं भवितव्य अडकून पडलंय, वसूलीची भूक आहे, रात्री हिशेब घेऊन ये, नोटा मोजायची मशीन साफ करून ठेवतो. पालक आणि बालकाचं काय? त्यांचं झालं की मातोश्रीचं काय? सरकार हिशोबावर चालतं, वसूली सरकार आहे. वसूली विरोधात आवाज उठवला की काय होतं? इथला कमिशनर माफिया संजय पांडे (sanjay pandey) नसल्यामुळे इथे पोलीस बंदोबस्त चांगला आहे. त्यामुळे इथल्या पोलिसांचे मी आभार मानतो. खार पोलीस (khar police) स्टेशनचं उदाहरण आपण पाहिलं. संजय पांडेंना लाज वाटत नाही, ज्या कमांडोंमुळे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) वाचला त्या कमांडोच्या ड्रायव्हरवर केस घेतली. त्यामुळे मी संजय पांडेंना सोडणार नाही. संजय राऊत का भी हिसाब होगा और संजय पांडे का भी, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या आज उल्हासनगरला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

आता मला ट्विटरवरून धमकी आली आहे. उल्हासनगरला या, खार पेक्षा चांगली व्यवस्था करू. याची पोलिसांनी नोंद घ्यावी. ट्विटरवर मला आज धमकी आली. त्याचं तुम्ही काय केलं? तुमची जबाबदारी आहे. 24 तासात धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा. आपण महाराष्ट्राचे पोलीस आहात. ठाकरे परिवाराचे नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्या दोघांना जामीन मिळणार नाही

मी दिल्लीत केंद्रीय गृह सचिव, एनआयए अधिकाऱ्यांना भेटलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2 गुंडांना 2019 मध्ये पोलीस दलात पुन्हा घेतलं. त्यांचा उपयोग वसूलीसाठी केला, अशी टीका सोमय्या यांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांचे नाव न घेता केली. एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितलं या दोघांना जामीन मिळू देणार नाही. उद्धव ठाकरेंनी वाझेच्या पुनर्नियुक्तीची फाईल मंत्रालयातून गायब केली. उल्हासनगरमध्ये रिडेव्हलपमेंट होत नाहीये. ते फायनल करण्यासाठी किती कोटी हवे आहेत? असा सवालही त्यांनी केला.

22 आरोप केले, एकही सिद्ध झाला नाही

28 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यावर अजमेरा बिल्डरची जमीन 900 कोटीत सरकारनं विकत घेतली. रोज सकाळी उठल्यावर कोंबडा आरवतो तसा उद्धव ठाकरेंचा प्रवक्ता, भोंगा बोलत असतो. त्यांनी आतापर्यंत माझ्यावर 22 आरोप केले, एकही सिद्ध होत नाही. उसका भी हिसाब होगा और संजय पांडे का भी होगा, असा इशाराही त्यांनी दिला.

मारने वाले से बचाने वाला बडा

थोडे दिवस उरले आहेत. ठाकरे साहेब करायची तितकी वसूली करा. नंतर जनता सोडणार नाही. सगळ्या मंत्र्यांनी आपापले वाझे तयार केले आहेत. अनिल परबचा एजंट बजरंग खरमाटे आहे. हा अनिल परबचा सचिन वाझे आहे. सोमय्या तुमचा सगळा हिशोब आणि सातबारा जनतेसमोर ठेवतोय. कितीही गुंड पाठवा, दगडं मारा. वाशीम, गोवा, खार.. 80 गुंड पाठवले. माफिया सेनेला सांगतो, मारने वाले से बचाने वाला बडा है, असंही ते म्हणाले.

शिव्यांची मोनोपॉली भोंग्याकडे

उद्धव ठाकरेंच्या साल्याची प्रॉपर्टी जप्त झाली. साला म्हणजे मेव्हणा. हिंदी आणि मराठीची गल्लत करू नका, मी शिवी नाही दिली. शिव्या देण्याची मोनोपॉली भोंग्याकडे आहे, असा टोला त्यांनी लगावला.

पाटकरांच्या कंपनीत राऊतांच्या मुलींची पार्टनरशीप

उल्हासनगर महापालिकेने कोव्हिड हॉस्पिटलच्या भाड्याचे 4 कोटी रुपये दिले. माफिया सेनेने कोव्हिडला पण कमाईचं साधन बनवलं. सुजित पाटकरच्या कंपनीला 100 कोटींचं काम कोणी दिलं? त्या कंपनीत संजय राऊत यांच्या दोन मुली आणि सुजित पाटकर पार्टनर होते. हा घोटाळा बाहेर काढून अजूनही कारवाई होत नाही. फक्त वसुली सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

आम्ही गहू घोटाळा बाहेर काढला

यावेळी सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवारांचा खराब गव्हाचा घोटाळा किरीट सोमय्याने बाहेर काढला. पवार कृषिमंत्री असताना गहू आयात व्हायचे, आता मात्र निर्यात करतो, असा चिमटा त्यांनी काढला.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...