VIDEO | बँकेची कॅश व्हॅन मुरबाडमधील गटारात अडकली, पलटी होणार तोच…
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अॅक्सिस बँकेच्या शाखेची कॅश घेऊन निघालेली गाडी गटारात अडकली होती. MH 04 KU 1105 क्रमांकाची गाडी मुरबाड नगर पंचायतीने खोदून ठेवलेल्या गटारामध्ये अडकली. सुदैवाने ही गाडी पलटी होता होता वाचली.
सुनील घरत, मुरबाड : बँकेची रोकड घेऊन जाणारी व्हॅन गटारात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. खड्ड्यात सापडल्यानंतर कॅश व्हॅन उलटणार होती. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
काय आहे प्रकरण?
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अॅक्सिस बँकेच्या शाखेची कॅश घेऊन निघालेली गाडी गटारात अडकली होती. MH 04 KU 1105 क्रमांकाची गाडी मुरबाड नगर पंचायतीने खोदून ठेवलेल्या गटारामध्ये अडकली. सुदैवाने ही गाडी पलटी होता होता वाचली.
आतापर्यंत कॅश व्हॅन अडवल्याच्या, लुटल्याच्या बातम्या आपण ऐकल्या-वाचल्या असतील. मात्र पैशांची वाहतूक करणाऱ्या गाडीचा असा विचित्र अपघात होण्याची ही पहिलीच वेळ असावी.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, बँकेसमोरच्या खड्डयात गाडी अडकल्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली होती. व्हॅनमध्ये रोकड असल्यामुळे सर्वांचीच धावपळ झाली होती. सुदैवाने चोरी किंवा तत्सम कुठलाही अपप्रकार इथे घडला नाही. तसंच अपघातात कोणालाही दुखापतसुद्धा झाली नाही.
विशेष म्हणजे, या अगोदरही या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे खड्ड्याप्रकरणी नगर पंचायत काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर महत्त्वाच्या बातम्या :
रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली, हेलिकॉप्टर अपघाताने सर्वोच्च नेतृत्वही गोंधळलं: संजय राऊत