AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर भिवंडीत, वाचा लोकार्पणाच्या कार्यक्रमाची A टू Z माहिती

महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्यांसारखे दिसावे म्हणून दीड एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. तटबंदीच्या खालील ३६ चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर भिवंडीत, वाचा लोकार्पणाच्या कार्यक्रमाची A टू Z माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर भिवंडीत
| Updated on: Dec 08, 2024 | 10:52 PM
Share

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या ठिकाणी साकारत आहे. येत्या 17 मार्चला तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पणाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ह.भ.प. कैलास महाराज निचीते, किल्ले रायगड येथील राजपुरोहित प्रकशस्वामी काशिनाथ जंगम यांसह प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि सदस्य उपस्थित होते. 4 मार्च 2018 ला भूमिपूजन झालेल्या मंदिराचे काम पूर्णत्वास आले आहे. मध्यंतरीच्या कोरोना संकटामुळे त्यामध्ये थोडा उशीर झाला असला तरी त्यानंतर अधिक जोमाने काम सुरू केले आहे. हे मंदिर फक्त दर्शनस्थळ न बनता शक्तीपीठ असावे, जेथे महाराजांचे जीवन समाजातील सर्व वर्गासाठी प्रेरणादायी राहील, असा कटाक्ष ठेवून या मंदिर उभारणीचा संकल्प केला होता, अशी माहिती अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी दिली आहे.

महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्यांसारखे दिसावे म्हणून दीड एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. तटबंदीच्या खालील ३६ चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आले आहेत. या चित्राची माहिती येथे भेट देणाऱ्या सर्वभाषिक शिवभक्तांना कळावी यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चित्रा खाली लिहण्यात येणार आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची मूर्ती साकारणारे मैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांच्या हातून अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून सहा फूट उंचीची सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती साकारण्यात आली आहे. या अखंड दगडातून साकारलेल्या या मूर्तीमधून चैतन्य कसे येईल याची काळजी मूर्ती घडविताना घेतली आहे, अशी माहिती राजूभाऊ चौधरी यांनी दिली.

तटबंदी दीड एकर क्षेत्रात

या परिसरात केवळ मंदिर नव्हे तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा व शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे. गाभारा सभामंडप हा परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा असून तटबंदी दीड एकर क्षेत्रात आहे. या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण, वैदिक शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेचा असून, हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ह भ प कैलास महाराज नीचीते यांनी व्यक्त केला आहे.

लोकार्पण सोहळा निमित्त 12 ते 17 मार्च दरम्यान वैदिक आणि पौराणिक ब्राम्हण यांच्याकडून शास्त्रोक्त पूजा करून हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी गोपूजन, होम हवन, 108 हवनकुंड, वास्तूपुजन आणि त्यानंतर कलश पूजन, लोकार्पण सोहळा संपन्न होईल. तर सायंकाळच्या वेळी स्थानिक कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम शिवचरित्र व्याख्यान, इतिहासकार, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत, अशी माहिती किल्ले रायगड येथील शिवराज्यभिषेक राजपुरोहित प्रकाशस्वामी जंगम यांनी दिली.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.