Megablock : प्रवाश्यांनो लक्ष असू द्या! मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
लोकल वाहतूक विस्कळीत होणार असल्यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून लोकल प्रवास सुरु करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- वाशी सेक्शनमध्ये विशेष उपनगरीय ट्रेन सेवा चालविण्यात येतील.
मुंबई : उपनगरी लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर स्विच पॉइंट, क्रॉस ओव्हर पॉइंट जोडण्यासाठी तसेच ओएचई कामासाठी दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक असेल. दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत होणार असल्यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून लोकल प्रवास सुरु करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- वाशी सेक्शनमध्ये विशेष उपनगरीय ट्रेन सेवा चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. (Megablock tomorrow on Central and Harbor Railway for maintenance repairs)
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर पनवेल – वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत (बेलापूर/नेरुळ- खारकोपर लाईन वगळून) ब्लॉक असेल. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या विशेष मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
मध्य रेल्वे मार्गावर दिवा ते कल्याणदरम्यान मेगाब्लॉक
दिवा-कल्याण अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत, ठाणे-कल्याण अप आणि डाउन धीम्या मार्गावर दुपारी 12.10 ते सायंकाळी 5.10 पर्यंत शॅडो ब्लॉक असेल. ठाणे येथून सकाळी 8.37 ते 11.40 आणि दुपारी 4.41 ते रात्री 8.59 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या/अर्ध जलद लोकल दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सेवा कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत.
मुलुंड येथून सकाळी 11.54 ते सायंकाळी 4.13 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या/अर्ध जलद लोकल मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सेवा कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानी निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून सकाळी 9.06 ते रात्री 8.31 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा येथे थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याण येथून सकाळी 8.51 ते 11.15 आणि सायंकाळी 6.51 ते 8.55 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांत थांबणार नाहीत.
याशिवाय कल्याण येथून सकाळी 11.25 ते दुपारी 3 .51 पर्यंत अप धीम्या/अर्ध जलद लोकल कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल सेवा ठाकुर्ली आणि कोपर स्थानकात थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानी निर्धारित वेळेच्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याण येथून सकाळी 8.46 ते रात्री 8.35 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा येथे थांबतील आणि निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. (Megablock tomorrow on Central and Harbor Railway for maintenance repairs)
इतर बातम्या
Anand Paranjpe: तर आम्हीही दुप्पट चोप देऊ शकतो; आनंद परांजपे यांचा मनसेला इशारा
करारा जवाब मिलेगा; राज ठाकरेंच्या सभेपूर्वी ‘मनसे’तून जोरकस चढाई…!