तीन चिमुकल्यांसाठी धावपळणाऱ्या आईचा मोबाईल चोरामुळे रेल्वे अपघातात मृत्यू, मनसे आमदाराचा कुटुंबियांना मदतीचा हाथ

रेल्वेने घरी परतत असताना कळवा रेल्वे स्थानकात डोंबिवलीची महिला विद्या पाटील हीचा मोबाईल चोरट्याने हिसकविल्याने झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला (MNS MLA Raju Patil said railway administration should help the family of vidya patil)

तीन चिमुकल्यांसाठी धावपळणाऱ्या आईचा मोबाईल चोरामुळे रेल्वे अपघातात मृत्यू, मनसे आमदाराचा कुटुंबियांना मदतीचा हाथ
मनसे आमदार राजू पाटील
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 10:56 PM

डोंबिवली (ठाणे) : रेल्वेने घरी परतत असताना कळवा रेल्वे स्थानकात डोंबिवलीची महिला विद्या पाटील हीचा मोबाईल चोरट्याने हिसकविल्याने झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या महिलेच्या कुटुंबियांना आम्हीही मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे (MNS MLA Raju Patil said railway administration should help the family of vidya patil).

या महिलेचा प्रवासा दरम्यान मोबाईल हिसकाविणाऱ्या आरोपीला याच प्रकारच्या गुन्हात अटक झाली होती. लॉकडाऊनच्या काळात हा आरोपी सुटून आल्यावर पुन्हा हेच गुन्हे करीत असल्याचे उघड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात हा आरोपी फलाटावर पोहचला कसा? हा संशोधनाचा विषय आहे. याकडेही रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, असे आमदार पाटील यांनी सांगितले (MNS MLA Raju Patil said railway administration should help the family of vidya patil).

कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला

विद्या पाटील ही 35 वर्षीय विवाहिता मुलींच्या शिक्षणासाठीच काम करीत होती. कोरोना महामारीत हातची नोकरी गेली तर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, या चिंतेने ती लॉकडाऊन काळातही नोकरीवर जात होती. चोरट्यासोबतच्या झटापटीदरम्यान काळाने तिच्यावर घाला घातला व मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिची सुरू राहिलेली अविरत तळमळ थांबली. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरट्याला जेरबंद केल्यानंतर ही ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली आहे. विद्या हिच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुलींच्या शिक्षणाबरोबर संसारात पतीला हातभार

विद्या पाटील ही अंधेरीतील साकीनाका येथे कामाला होती. घरी परतण्यासाठी तिने ठाण्याहून लोकल पकडली होती. गाडी फलाटावर आल्यावर चोरट्याने तिचा मोबाईल हिसकावला आणि तो विरुद्ध दिशेने पळत होता. त्याचा पाठलाग करताना ती लोकलखाली आली व त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. विद्याचे पती ज्ञानेश्वर इलेक्ट्रीशियनचे काम करतात. विद्याला पूर्वा (9), मेधा (6) आणि आठ महिन्याची परी या तीन मुली आहे. मुलींना चांगले शिक्षण देऊन मोठे करण्याचा तिचा मानस होता. त्यासाठी ती काम करुन मुलींसह पतीच्या संसाराला  हातभार लावत होती. तिच्या अपघाती मृत्यूमुळे तिन्ही मुली पोरक्या झाल्या आहे. ती कामाला जात असताना तिच्या आठ महिन्याच्या परीचा सांभाळ तिचे सासू सासरे करीत होते. लॉकडाऊनमध्येही ती नोकरी संभाळून होती. राज्यातील कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. अशातच चोरट्याने लोकलमध्ये शिरुन महिलेचा जीव घेतल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सराईत गुन्हेगार फैजल शेख पोलिसांच्या ताब्यात

मोबाईलची चोरी करण्यासाठी विद्या पाटील यांच्यासोबत झटापट करणारा 31 वर्षीय फैजल शेख याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूवीर्ही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत

हेही वाचा : Video : स्वाभिमानीच्या रविकांत तुपकरांची पोलिसांसमोरच दंडुकेशाही, जिल्हा अभियंत्याला लावले खोदकाम

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.