संजय राऊत यांनी ठाण्यात जावून मुख्यमंत्र्यांना डिवचलं, म्हणाले, ‘ठाणे सोडून पळावं लागेल’, पाहा VIDEO
खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ठाकरे गटाकडून उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला. यावेळी 'हम तख्त बदलेंगे, ताज बदलेंगे, गद्दारोंका राज बदलेंगे', असं संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले.
ठाणे | 29 जुलै 2023 : शिवसेना ठाकरे गटाचा आज ठाण्यात उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. पण त्याआधी खासदार संजय राऊत यांनी पाच मिनिटांचं भाषण केलं. राऊतांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांना डिवचलं. काही लोकांना आता ठाणे सोडून पळावं लागेल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. “ठाणे शहराचं नुसतं नाव काढलं तरी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने रोमांच उभं राहतं हे ठाणे शहर आहे”, असं संजय राऊत आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले.
“ठाणे शहर म्हणजे निष्ठा. दुसरं काही नाही. ज्या शहराने सर्वात पहिले शिवसेनेचा भगवा फडकवला ते हे ठाणे शहर. गडकरी रंगायतन हे बाळासाहेब ठाकरे यांचं देण आहे. या गडकरी रंगायतनमध्ये आतासुद्धा तीच श्रद्धा, निष्ठा आणि ताकद दिसत आहे. हे वातावरण पाहून मला वाटतं की, काही लोकांना लवकरच ठाणे सोडून पळावं लागेल”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘हम तख्त बदलेंगे, ताज बदलेंगे, गद्दारोंका राज बदलेंगे’
“आम्ही इथे आलो आहोत आणि येत राहू. हे ठाणे शहर आमचं आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. मी ठाणे शहरातून एकच संदेश देतो, हम तख्त बदलेंगे, ताज बदलेंगे, गद्दारोंका राज बदलेंगे. हा संदेश फक्त ठाणे शहरातून देणं जरुरीचं होतं म्हणून आम्ही सर्व ठाणे शहरात आलो आहोत”, असं राऊत म्हणाले.
“आम्ही आपले आभारी आहोत की ज्या संख्येने आमचे हिंदी भाषिक कार्यकर्ते आले आहेत. मी त्यांच्या सगळ्यांचं स्वागत करतो. ठाणे हे मर्दांचं शहर आहे आणि राहिलंय. डरपोक लोकांचं शहर म्हणून याकडे कधी पाहिलं नाही. आम्ही आनंद दिघे यांना पाहिले. त्यांच्याकडे पाहून हिंमत यायची. आनंद दिघे हे कोणत्याही संकटात बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदे लावून उभे राहिले”, अशी आठवण त्यांनी सांगितलं
“संकट आल्यावर पळून जातो तो नामर्द असतो. आमच्यासमोर मर्दांची फौज उभी आहे. त्यामुळे गद्दारोंका राज, तख्त हम उद्ध्वस्त कर देंगे”, असं म्हणत राऊतांनी आपलं भाषण संपवलं.