TMC Commissioner : ठाण्यात वर्तकनगरमध्ये आवश्यक कामे पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश
तुळशीधाम येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बायोमेट्रिक करणे, कृष्णानगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे : महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर प्रभाग समितीमधील विविध ठिकाणाच्या स्वच्छतेसह ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती, उद्यानातीत व रस्त्यावरील करावयाच्या स्थापत्त्य कामांची आज महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी पाहणी केली. यावेळी परिसर स्वच्छतेसोबत रंगरंगोटी, उद्यानात आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज वर्तकनगर प्रभाग समिती येथून स्वच्छता कामांची पाहणी (Inspections) करण्यास सुरुवात केली. या पाहणी दौऱ्यास माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, आशादेवी शेरबहाद्दूर सिंह, माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे व अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, संबंधित प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. (Municipal Commissioner’s instructions to complete necessary works in Vartaknagar Thane)
महापालिका आयुक्तांचा विकास कामांचा पाहणी दौरा
या पाहणी दौऱ्यामध्ये पोखरण रोड येथील स्व. प्रमोद महाजन निसर्ग उद्यानाची पाहणी करण्यात आली. या उद्यानात पाणपोई बसविणे तसेच उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला विद्युत खांब इतरत्र हलविणे, आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था करणे, कोठारी कंपाऊंड येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. या पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कामे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधितांना दिले.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर असलेल्या पोलीस चौकीसाठी पर्यायी जागेची शहानिशा करुन ती स्थलांतरीत करणे. तसेच तुळशीधाम येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बायोमेट्रिक करणे, कृष्णानगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Municipal Commissioner’s instructions to complete necessary works in Vartaknagar Thane)