देखो आज के बम का धमाका… सपक डाळीला दिलाय तडका; नरेश म्हस्के यांचं सूचक ट्विट चर्चेत

यापूर्वीच नाशिकमधील 34 नगरसेवकांपैकी ठाकरे गटाचे दोन डझन नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

देखो आज के बम का धमाका... सपक डाळीला दिलाय तडका; नरेश म्हस्के यांचं सूचक ट्विट चर्चेत
देखो आज के बम का धमाका... सपक डाळीला दिलाय तडका; नरेश म्हस्के यांचं सूचक ट्विट चर्चेतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 8:52 AM

ठाणे: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी संजय राऊत नाशिकला आले आहेत. मात्र, त्यापूर्वीच शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. नरेश म्हस्के यांनी कवितेच्या माध्यमातून ठाकरे गटाला सूचक इशारा दिला असून नाशिकमध्ये ठाकरे गट फूटत असल्याचं स्पष्ट केलं आहे. आज पुन्हा उडणार आहे भडका… सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका… असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिलाय. तसेच देखो आज के बम का धमाका असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. ठाण्याचे माजी महापौर आहेत. त्यांचे ट्विट नेहमीच चर्चेत असतात. ठाकरे गटावर ते सातत्याने प्रहार करत असतात. खासकरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतात.

विशेष म्हणजे नरेश म्हस्के हे नाशिकच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. नाशिकमधील ठाकरे गटाच्या राजकीय घडामोडींवर ते वारंवार भाष्य करत असतात. आजही त्यांनी केलेलं ट्विट त्यामुळेच चर्चेत आलं आहे.

संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या ते नाशिकमध्ये आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे 50 पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

विभाग प्रमुखांपासून ते तालुका प्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. ठाकरे गटात हे खिंडार पडणार असल्याचं ट्विटच नरेश म्हस्के यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कवितेच्या माध्यमातून त्यांनी हे सूचक विधान केलं आहे.

म्हस्के यांची कविता जशीच्या तशी

आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका

सकाळच्या भोंग्याला पुन्हा एक चपराक बसेल खरे मावळे कुठे आहेत सगळ्या जगाला दिसेल

बाळासाहेबांच्या नावावर राष्ट्रवादीचे दुकान चालवले म्हणून खरे शिवसैनिक एकेक करून सोडून चालले

बसा आता टाळ कुटत, चाललाय सगळा ताल चुकत एकेक संधी चालली हुकत, तरी यांना कोणी नाही रोखत

खिंडार पडणे सुरूच

दरम्यान, यापूर्वीच नाशिकमधील 34 नगरसेवकांपैकी ठाकरे गटाचे दोन डझन नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट असतानाच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.

ठाकरे गटाचे 50 हून अधिक पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली असून नाशिक जिल्ह्यातील पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.