आईने केला पोटच्या पोराचा सौदा; पोलीस बनले ग्राहक, सहा जणांना अटक
आपल्या मुलाचे भविष्य घडवण्यासाठी आई-वडील अहोरात्र झटत असतात. मोठ्या कष्टाने ते आपल्या पाल्याचे भविष्य घडवतात. मात्र दुसरीकडे असे देखील काही आई-वडील आहेत, जे थोड्या पैशांसाठी पोटच्या मुलाला विकायला तयार होतात. मणुसकीला काळीमा फासणारी अशीच एक घटना ठाण्यातून समोर आली आहे.
ठाणे : आपल्या मुलाचे भविष्य घडवण्यासाठी आई-वडील अहोरात्र झटत असतात. मोठ्या कष्टाने ते आपल्या पाल्याचे भविष्य घडवतात. मात्र दुसरीकडे असे देखील काही आई-वडील आहेत, जे थोड्या पैशांसाठी पोटच्या मुलाला विकायला तयार होतात. मणुसकीला काळीमा फासणारी अशीच एक घटना ठाण्यातून समोर आली आहे. पैशांसाठी दलालामार्फत आपल्याच मुलाला विकणाऱ्या आई-वडिलांसह सहा जणांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दलालाच्या मध्यस्थीने नवजात बाळाचा सौदा होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला, पोलीस स्वत: ग्राहक बनले व खात्री पटताच त्यांनी सहा जणांना अटक केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पोलीस बनले ग्राहक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील भिवंडी भागात चार दिवसांपूर्वीच जन्मलेल्या नवजात बाळाचा दलालाच्या मध्यस्थिने सौदा करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस स्वता: ग्राहक बनले, व त्यांनी संबंधित दलाला संपर्क केला. दलालाने त्यांना एका हॉटेलमध्ये बोलावले. पोलीस ठरल्याप्रमाणे ग्राहक बनून त्या हॉटेलमध्ये पोहोचले. पोलीस हॉटेलमध्ये येताच ठरल्याप्रमाने संबंधित महिला आपल्या काही नातेवाईकांसह बाळाला घेऊन त्या हॉटेलमध्ये पोहोचली. दीड लाखांमध्ये बाळाचा सौदा करण्यात आला. सौदा झाल्यानंतर ग्राहक बनून आलेल्या पोलिसांनी संबंधित महिलेसह सहा जणांना अटक केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती
दरम्यान या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, मुमताज वकील अन्सारी असे या बाळाच्या आईचे नाव आहे. तर वकील शकील अन्सारी असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून, यापूर्वी देखील अशा काही घटना घडल्या आहेत का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित बातम्या
Jharkhad Crime: लज्जास्पद! झारखंडमध्ये चेटकीण असल्याचे सांगत वृद्ध महिलेला मारहाण
Mhada Exam: आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला, नवी तारीख म्हाडा ठरवणार
Raigad Crime : माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह, आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान