AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही’, पनवेलच्या उपमहापौरांचा इशारा

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर फिरू  देणार नाही, असा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला.

'...तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही', पनवेलच्या उपमहापौरांचा इशारा
पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 9:19 PM
Share

डोंबिवली (ठाणे) : नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर फिरू  देणार नाही. इतकेच नाही तर पंतप्रधान कार्यालयासमोर लंगोटी आंदोलन करणार, असा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी डोंबिवलीत दि. बा. पाटील विमानतळ नामकरण समितीच्या परिषदेत दिला. या वादग्रस्त विधानामुळे जगदीश गायकवाड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

डोंबिवलीत विमानतळ नामकरण परिषदेचे आयोजन

दि. बा. पाटील विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवली प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये आज (17 जुलै) एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नामकरण समर्थन समिती कल्याण डोंबिवलीतर्फे विमानतळ नामकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप नेते जगन्नाथ पाटील लालबावटा रिक्षा युनियन अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर, समिती अध्यक्ष दशरथ पाटील, राष्ट्रवादीचे नेते अर्जुन बुवा चौधरी, कॉम्रेड कृष्णा भोयर, कॉग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवर उपस्थित होते.

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी स्थानिक आक्रमक

नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) नाव देण्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्य सरकारनं नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवला आहे. तर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती देखील दि.बा. पाटील (D.B.Patil) यांच्या नावासाठी आक्रमक झाली आहे.

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी ठाणे, नवी मुंबई, रायगड येथील स्थानिक आगरी, कोळी समास आक्रमक झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांकडून दि. बा. पाटील यांच्या नावासाठी ठिकठिकाणी मानवी साखळीचं आयोजन करुन आंदोलन करण्यात आलं होतं. याशिवाय नवी मुंबईत सिडको घेराव आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात लाखो भूमिपूत्र एकत्र आलेले बघायला मिळाले होते. या आंदोलनात अनेक स्थानिक वारकरी देखील सहभागी झाले होते.

हेही वाचा :

डोक्यावर पाऊस, हातात झेंडे, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाच्या घोषणा, पुढचं आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.