अचानक लाईट गेली, नंतर 31 तास उलटूनही आली नाही, कारण माहित पडल्यानंतर नागरिकांचा संताप
अचानक लाईट गेली आणि आलीच नाही तर? अशी कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. मात्र, तसा अनुभव सध्या टिटवाळ्यातील आर. के. नगरच्या नागरिकांना येत आहे (Power supply in Titawala cut off due to transformer scarcity).
कल्याण (ठाणे) : अचानक लाईट गेली आणि आलीच नाही तर? अशी कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. मात्र, तसा अनुभव सध्या टिटवाळ्यातील आर. के. नगरच्या नागरिकांना येत आहे. तिथे गेल्या 31 तासांपासून लाईट गेली आहे. पण अद्यापही आलेली नाही. लाईट जाण्यामागील कारण समोर आलं आहे. मात्र, संबंधित तांत्रिक बिघाड सुधारण्यासाठी कोणत्या गोष्टीची अडचण आहे याबाबत महावितरणाकडून देण्यात आलेलं उत्तर ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल. महावितरणाला काम करण्यासाठी क्रेन मिळत नसल्याने काम रखडल्याचं उत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय (Power supply in Titawala cut off due to transformer scarcity).
अचानक लाईट जाण्यामागील कारण काय?
लाईट जाण्यामागील कारण म्हणजे आर. के. नगर येथील विजेचा ट्रान्सफार्मर खराब झाला आहे. नागरिकांनी लाईट आता येईल तेव्हा येईल असं म्हणत वाट बघत जवळपास रात्री उशिरापर्यंत वाट बघितली. नागरिकांना अखेर रात्र अंधारातच काढावी लागली. त्यात त्यांना गरमीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. सकाळी ट्रान्सफार्मर आणला गेला. मात्र क्रेन नसल्याने हा ट्रान्सफार्मर बसविता आला नाही. या अत्याधुनिक काळात महावितरण वीज कंपनीला क्रेन मिळत नाही ही शोकांतिका आहे, असं मत स्थानिक शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी मांडलं.
24 तास उलटून गेले तरी वीज आली नाही म्हणून नागरीकांनी विचारपूस केली तेव्हा ट्रान्सफार्मर येतोय, असं उत्तर देण्यात आलं. मात्र अद्याप आलेला नाही. इतका मोठा टिटवाळा परिसर आहे. तरीही राखीव ट्रान्सफार्मर वीज वितरण कंपनीकडे नव्हते. तंत्रज्ञानाच्या या युगात हे असं काहीसं होत आहे, याबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वीज वितरण कंपनीची भूमिका काय?
दरम्यान, यासंदर्भात बोलण्यासाठी आम्ही वीज वितरण कंपनीचे कल्याण ग्रामीण विभागाचे अभियंता सिद्धार्थ तावाडे यांच्याशी संपर्क साधला. “कंत्राटदाराने ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन दिला आहे. त्याच्याकडे क्रेन नसल्याने काम करण्यास विलंब झाला आहे. आमच्याकडून क्रेन उपलब्ध करुन दिली गेली आहे. आता वीज पुरवठा सुरळीत केला जाणार आहे”, अशाप्रकारचं उत्तर त्यांनी दिलं. पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला (Power supply in Titawala cut off due to transformer scarcity).
हेही वाचा : ‘…तर परिणाम भोगावे लागतील’, मनसे आमदार राजू पाटलांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम