Thane Rains : ठाण्यापासून बदलापूरपर्यंत काय तो पाऊस, काय ते खड्डे, काय ती ट्रॅफिक, काय ती रस्त्यांची चाळण, पब्लिक नुसती हैराण!

Thane Rains : पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास या धोक्यांचा अंदाज वाहनांना, पादचाऱ्यांना न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्त्याच्याकडेला चिखल साचलेला आहे, तर खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे.

Thane Rains : ठाण्यापासून बदलापूरपर्यंत काय तो पाऊस, काय ते खड्डे, काय ती ट्रॅफिक, काय ती रस्त्यांची चाळण, पब्लिक नुसती हैराण!
ठाण्यापासून बदलापूरपर्यंत काय तो पाऊस, काय ते खड्डे, काय ती ट्रॅफिक, काय ती रस्यांची चाळणImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 2:35 PM

गणेश थोरात, ठाणे: गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावासाने ठाणे (thane) जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे जिल्ह्यात तर रात्रीपासून पावसाने (rain) चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात चांगलीच दाणादाण उडाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबनरनाथ ते बदलापूरपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यावर भले मोठे खड्डे (potholes) पडले आहेत. त्यामुळे वाहनांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून वाहनचालक आणि प्रवाशी प्रचंड वैतागले आहेत. काही ठिकाणी तर पावसामुळे रस्तेच वाहून गेले आहेत. बदलापूरमध्ये तर उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीलगतच्या नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय बदलापूरचं बारवी धरणही 50 टक्के भरलं आहे. हा पाऊस असाच राहिल्यास बारवी धरण केव्हाही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.

उल्हासनदी धोक्याच्या पातळीवर

मागील 24 तासांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उल्हास नदी ही धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली असून त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास बदलापूर शहरात पुन्हा एकदा उल्हास नदीच्या पुराचं पाणी घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. उल्हास नदीची धोक्याची पातळी ही 16.50 मीटर इतकी आहे. सध्या उल्हास नदीची पातळी 16.20 मीटर इतकी पोहोचली असून मुसळधार पाऊस सुद्धा सुरूच आहे. त्यातच बदलापूर शहरातील सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली असून उल्हास नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली, तर मात्र बदलापूर शहराला दरवर्षीप्रमाणे यंदाही पुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त होतेय.

हे सुद्धा वाचा

बदलापूरचं बारवी धरण 50 टक्के भरलं

गेल्या गेल्या काही दिवसात बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे बारवी धरण 50 टक्के भरलं आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण लवकर भरण्याची आशा निर्माण झाली आहे. बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा होतो. यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली होती. जून महिन्यात बारवी धरणात अवघा 31 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार बॅटिंग सुरू केली असून त्यामुळे बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बारवी धरणात सध्या 50 टक्के पाणीसाठा तयार झाला असून गेल्या वर्षी आजच्याच दिवशी हाच पाणीसाठा अवघा 41 टक्के इतका होता. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरण लवकर भरेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

बदलापुरात दोन मालवाहू रिक्षा उलटल्या

बदलापुरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन मालवाहू रिक्षा उलटल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी हे अपघात घडले. हे दोन्ही अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. बदलापूर शहरातून बारवी डॅममार्गे मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरील वालीवली गावाजवळ तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. शनिवारी 9 जुलै रोजी दुपारी एक मालवाहू रिक्षा या रस्त्यावरून जात असताना खड्ड्यांमुळे ही रिक्षा उलटली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा याच ठिकाणी आणखी एक मालवाहू रिक्षा उलटली. या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या. सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये चालकांना फारशी इजा झाली नाही. मात्र या दोन्ही घटनांनी या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीचं या रस्त्याकडे किती अक्षम्य दुर्लक्ष होतंय, हे पुन्हा एकदा समोर आलंय.

बदलापूर-मुरबाड रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य

बदलापूरहून मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यावर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतेय. या रस्त्याच्या डागडुजीकडे एमआयडीसीकडून दुर्लक्ष केलं जातंय. बदलापूर शहरातून मुरबाडला जाण्यासाठी बारवी डॅममार्गे एकमेव रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर अहमदनगर, शिर्डी, माळशेज, शहापूर, नाशिक या भागात जाण्यासाठीही होत असल्यानं या रस्त्यावर बाराही महिने प्रचंड वर्दळ असते. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं मुळगाव, बारवी डॅम या भागात जाण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येनं येतायत. मात्र हा रस्ता सध्या पूर्णपणे खड्ड्यात गेला असून रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर रस्ता कुठे आणि खड्डे कुठे हे देखील समजायला मार्ग उरलेला नाही.

या रस्त्यावर अक्षरशः 7 ते 8 फूट लांबीचे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागतेय. गाड्या खड्ड्यात आदळून गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. दुचाकी चालकांना या खड्ड्यांमुळे सर्वाधिक त्रास होत असून अपघातांचं प्रमाणही गेल्या काही दिवसात चांगलंच वाढलंय. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. मात्र एमआयडीसीकडून या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळे आता एखादा मोठा अपघात होऊन कुणाचा जीव गेल्यावरच रस्त्याची डागडुजी होईल का? असा प्रश्न विचारला जातोय.

गणेश घाटावर साचले पाणी

काल सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात रिप रिप पडत असलेल्या पावसाने आज सकाळी 9 वाजल्यापासून चांगलाच जोर पकडला आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कल्याणमध्ये दुर्गाडी खाडीचे पाणी देखील वाढले असून गणेश घाटाच्या रेलिंगला पाणी लागलं आहे .कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून ठेवले आहे. तसेच प्रशासनाकडून या परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

डोंबिवलीमधील भोपर रस्ता गेला वाहून

डोंबिवलीमधील रस्ता पाण्यात अक्षरशः वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .तर 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोनल करणार, असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यावर काय ते पाणी, काय खड्डे, काय तो चिखल, मात्र केडीएमसी अधिकारी आणि ठेकेदार ओकेमध्ये आहेत, अशीच परिस्थिती झाली आहे.

पावसाला आता कुठे सुरवात झाली नाही तोच डोंबिवली ग्रामीण भागातील भोपर रोडवर मोठे खड्डे पडून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 27 गावांत अमृत योजने अंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. या कामासाठी हा भोपरचा अर्धा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला होता. खोदलेल्या या रस्त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. गेल्या महिन्यात कंत्राटदाराने या रस्त्याचे डांबरीकरण केले. परंतु हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पहिल्या पावसातच रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. भोपर कमान ते शनी मंदिर पर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. हा रस्ता उतारावर असल्याने रस्त्यावरुन पावसाचे पाणी वहात असते. गतिरोधकांमुळे पावसाचे पाणी साचत असून हे पावसाचे पाणी जाण्यासाठी चक्क गतिरोधकच खोदून पावसाच्या पाण्यास वाट काढून देण्यात आली आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास या धोक्यांचा अंदाज वाहनांना, पादचाऱ्यांना न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्त्याच्याकडेला चिखल साचलेला आहे, तर खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. रस्त्यावरून चालताना वाहन चालकांना त्याचबरोबर पादचाऱ्यांना खड्ड्यांच्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर 15 दिवसात खड्डे बुजवले नाहीतर मोठे आंदोनल करणार असा इशारा कल्याण जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आला आहे.

वंदना बस डेपो समोर पाणीच पाणी

सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील वंदना एसटी बस डेपो या ठिकाणी सखोल भागात गुडघा भर पाणी साचले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने सदर ठिकाणी सक्षम पंप लावण्यात आले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागत आहे. पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहनांना देखील वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पुढील 3 ते 4 दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने देखील सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.