जे पुण्यात, तेच ठाण्यात, तिकिटासाठी मनसेत येऊ नका, राज ठाकरेंच्या 8 महत्त्वाच्या सूचना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे सैनिकांशी संवाद साधला. राज यांनी पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर मनसे सैनिकांना ज्या सूचना दिल्या होत्या. (Raj Thackeray)

जे पुण्यात, तेच ठाण्यात, तिकिटासाठी मनसेत येऊ नका, राज ठाकरेंच्या 8 महत्त्वाच्या सूचना
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 2:33 PM

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे सैनिकांशी संवाद साधला. राज यांनी पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर मनसे सैनिकांना ज्या सूचना दिल्या होत्या. त्याच सूचना आज ठाण्यातील मनसे सैनिकांना दिल्या. तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करत असेल तर अजिबात मनसेत प्रवेश करू नका, असं फर्मानच राज ठाकरे यांनी सोडलं. (raj thackeray’s 8 suggestions to mns workers ahead thane corporation election)

राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आधी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर ‘जनसंवादा’च्या माध्यमातून त्यांनी मनसे सैनिकांशी संवाद साधला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा आहे. संघटना बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. येत्या 15-20 दिवसात मी पुन्हा ठाण्यात येईल आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

नुसती पाहणी करण्यात अर्थ नाही

यावेळी त्यांनी राज्यातील पूरपरिस्थिवरही भाष्य केलं. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करत आहे. मीही आवाहन केलं होतं. त्यानुसार मनसे सैनिकांनी प्रत्येक गावात जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. इतरही पक्षाचे लोक मदत करत आहेत. अशावेळी मदत करणं महत्त्वाचं आहे. नुसता पाहणी दौरा करण्यात काही अर्थ नाही. जेवढी मदत पूरग्रस्तांना मिळेल तेवढं चांगलं आहे, असं ते म्हणाले.

शहरांचं नियोजन नाही

यावेळी त्यांनी पूरपरिस्थिती आणि त्याच्या कारणांवरही भाष्य केलं. शहरांचं म्हणून आपल्याकडे नियोजन नाही. पहिल्यांदा अशी घटना घडली नाही. दोन वर्षापूर्वी आणि त्या आधीही महाराष्ट्रास कोकणात असं घडलं होतं. याला कारण वस्त्या वाढत आहेत. या वाढणाऱ्या वस्त्यांना आकार ऊकार नाही. शहराला आकार ऊकार द्यावा असं कोणत्याही सरकारला वाटत नाही. लहान असताना मी ठाण्यात यायचं, तेव्हा टुमदार शहर अशी ठाण्याची ओळख होती. आज या ठाण्याची काय अवस्था झाली आहे? टाऊन प्लानिंग नाही, काहीच नाही, असं ते म्हणाले.

तू काळजी करू नको

यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर, मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तू काळजी करू नको, असं ते म्हणाले.

8 सल्ले आणि सूचना

>> सोशल मीडियाचा वापर कमी करा >> स्थानिक पत्रकारांना धरून राहा. तुमच्या कार्यक्रमाची माहिती त्यांना द्या. असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खुश असतील >> प्रभाग अध्यक्षपद रद्द करण्यात येणार आहे. प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देण्यात येणार. पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार >> 25 दिवसांनंतर ठाण्यात देखील प्रभाग अध्यक्षपदाला पर्याय देणार >> निवडणुकीच्या तयारीला लागा >> ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत. तेवढेच वार्ड, शाखाध्यक्ष मला पाहिजेत. शाखाध्यक्षांची संख्या जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे >> अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका. एकमेकांशी जोडून राहा. पक्षबांधणी करा. नव्यांनी आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करू नका. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी विचार करा. त्याच्यासाठी मेहनत करा >> जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका. (raj thackeray’s 8 suggestions to mns workers ahead thane corporation election)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका : राज ठाकरे

VIDEO: राज्यपाल नेहमीच घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; संजय राऊत संतापले

कोल्हापूर, सांगलीला अलमट्टी धरणामुळे महापूर नाही, अजित पवारांनी नेमकं कारण सांगितलं

(raj thackeray’s 8 suggestions to mns workers ahead thane corporation election)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.