माझे भाषण संपताच व्हॉट्सअ‍ॅपवरून संपूर्ण उत्तर प्रदेशात पाठवा, जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांना आवाहन

उत्तर प्रदेशात होत असलेली विधानसभेची निवडणूक साधीसुधी नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कोणीही गाफिल राहू नका. तुम्ही आज जे ठरवणार आहात तेच तुमचं भविष्य आहे.

माझे भाषण संपताच व्हॉट्सअ‍ॅपवरून संपूर्ण उत्तर प्रदेशात पाठवा, जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांना आवाहन
माझे भाषण संपताच व्हॉट्सअ‍ॅपवरून संपूर्ण उत्तर प्रदेशात पाठवा, जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 2:07 PM

ठाणे: उत्तर प्रदेशात (uttar pradesh) होत असलेली विधानसभेची निवडणूक साधीसुधी नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कोणीही गाफिल राहू नका. तुम्ही आज जे ठरवणार आहात तेच तुमचं भविष्य आहे. तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला (bjp) संपवून टाका, असं आवाहन करतानाच माझे हे संपूर्ण भाषण उत्तर प्रदेशात व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल करा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केलं आहे. मुंब्रा येथील अमृत नगरमध्ये पालिका विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या प्रभागातील विकास कामांचा जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर देशातील पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे. काय होणार? काय नाही? हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर अवलंबून आहे. कुणाला मतदान करायचे हे मी सांगणार नाही. परंतु भाजप हरले पाहिजे हे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये जाऊन लोकांना सांगा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः उत्तर प्रदेश मध्ये जाणार आहे. भाजप विरोधात प्रचार करणार आहे, असं आव्हाड म्हणाले.

जज्बातवर राजकारण होत नाही

माझ्यावर बुलंद शहरातील उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशात जाऊन भाजप विरोधात प्रचार करणार आहे. पण काही जण भाजपची सुपारी घेऊन उत्तर प्रदेशात उभे आहेत. मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठीची ही खेळी आहे. त्यापासून सावध राहा. स्वतःची अक्कल लावा. मतदान कोणाला दिले पाहिजे हे तुम्ही ठरवा. जज्बातवर राजकारण होत नाही. तुमच्यात फूट पडणार. पण जिंकणार कोण? तर ते जिंकतील. पण नुकसान कोणाचे होणार? आपले होणार आणि देशाचे होणार?, असा सवाल त्यांनी केला.

विचार करूनच मतदान करा

ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. 2024मध्ये दिल्लीच्या सत्तेत कोण बसणार हे सांगणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून चला. जे तुम्ही ठरवणार ते पुढील भविष्य असणार आहे. भविष्य बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका. माझे भाषण संपताच पूर्ण उत्तर प्रदेशात हे भाषण व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून टाका, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची ऐसी तैसी झालेली पाहायला मिळाली. अनेकांनी तर मास्कही लावलेले नव्हते.

संबंधित बातम्या:

Uttar pradesh assembly election 2022: बसपाची 51 उमेदवारांची यादी जाहीर, मायावतींचा ‘नवा नारा’ काय?

महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; 2 फेब्रुवारीला रणनीतीवर काथ्याकूट, भाजपसोबत जाणार का?

पुन्हा एकदा क्लस्टरचे गाजर .. ! राष्ट्रवादी युवकच्या बॅनरबाजीनं ठाण्यात पुन्हा आघाडीत बिघाडीचं दर्शन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.