‘ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय, मलाही वाईट वाटतंय’, श्रीकांत शिंदे यांची खोचक प्रतिक्रिया

"अरे काय ते, तेच तेच, आता नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे. तेच गद्दार, खोके, खंजीर, चोर, अरे काय, दुसरं काहीतरी करा. आता लोकांचा रिस्पॉन्स तुम्ही बघितला असेल की, लोकांची भावना काय आहे ती", अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.

'ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय, मलाही वाईट वाटतंय', श्रीकांत शिंदे यांची खोचक प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 8:39 PM

मयुरेश जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 13 जानेवारी 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “मला वाटतं उद्धव ठाकरेंचं स्वागत मी अगोदरच केलं आहे. ते इकडे आल्यानंतर त्यांना त्यांची परिस्थिती काय आहे, याची जाणीव नक्कीच झाली असेल. अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये असेल, सर्व पक्ष एकत्र केले, उबाठा, राहिलेली राष्ट्रवादी, आप, वंचित, काँग्रेस या सगळ्यांना एकत्र केल्यानंतरदेखील 200-300 लोकं देखील जमा झाले नाहीत. आमच्याबरोबर अगोदर यायचे तेव्हा त्यांचं स्वागत कसं व्हायचं, याची त्यांना जरुर आठवण होत असेल. मी माहिती घेतली तर ते आले होते तिथे लोकं देखील नव्हती, अशी परिस्थिती होती. हे गल्लोगल्ली फिरायला लागतंय, त्यांचं स्वागत आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

“तेच तेच शब्द, तेच तेच टोमणे, लोकांना आता कंटाळा आला आहे. लोकांना आता काम हवं आहे. आम्हाला सांगितलं असतं की, लोकांची कमी आहे तर आम्ही इकडून जरा पाठवले असते”, असा खोचक टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला. “फ्रस्टेशनमध्ये पातळी सोडून भाष्य केलं जातंय. आम्ही पातळी सोडून कधीही टीका करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचे आमच्यावर चांगले संस्कार आहेत. ठाकरेंसारख्या माणासाने श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येणं, गल्लोगल्ली सात तास फिरणं, अगोदर हे सर्व केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. मलाही वाईट वाटतंय की त्यांना गल्लोगल्ली फिरावं लागतंय. पण तेही करुन त्यांना रिस्पॉन्स मिळत नाहीय. येणाऱ्या काळात त्यांनी चांगला उमेदवार शोधावा”, असं चॅलेंज श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.

‘तेच गद्दार, खोके, खंजीर, चोर, अरे काय…’

“अरे काय ते, तेच तेच, आता नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे. तेच गद्दार, खोके, खंजीर, चोर, अरे काय, दुसरं काहीतरी करा. आता लोकांचा रिस्पॉन्स तुम्ही बघितला असेल की, लोकांची भावना काय आहे ती. त्यामुळे येत्या काळात त्यांनी बोध घेतला पाहिजे की, ही लोकं कुणासोबत राहतील. जो माणूस दिवसाचे 24 तास काम करतो की ज्याने कोरोना काळात स्वत:ला बंद करुन घेत महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं. ही वस्तुस्थिती जितक्या लवकर ते ओळखतील तितक्या लवकर त्यांना सावरण्याचा वेळ मिळेल”, असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला.

“मला कुणीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी मी कुणाला उत्तर देण्यासाठी इथे नाही. आपलं काम हे आपलं उत्तर आहे. कल्याण लोकसभेची जनता येणाऱ्या काळात मतपेटीतून उत्तर देईल”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. दरम्यान, “येणाऱ्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण दिवाळी म्हणून तो दिवस साजरा करणार आहे”, असंही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.