कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी ठाण्यात विशेष लसीकरण सत्र
लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. पालिकेनेकडून कौटुंबिक हिंसाचार व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या 13 महिलांचे आज काजूवाडी आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
ठाणे : लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेकडून करण्यात येत आहे. पालिकेकडून कौटुंबिक हिंसाचार व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या 13 महिलांचे आज काजूवाडी आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तर यापुढेही आयोजित करण्यात येणाऱ्या लसीकरण सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले. (Special corona vaccination session in Thane for women who are victims of domestic violence and sexual abuse)
काजूवाडी आरोग्य केंद्रावर ‘’विशेष लसीकरण सत्र’’
शहरातील कौटुंबिक हिंसाचार व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज काजूवाडी आरोग्य केंद्रावर ‘’विशेष लसीकरण सत्र’’ आयोजित करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र नसलेल्या महिलांनादेखील या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली.
लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा
आज शहरातील एकूण 13 महिलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी उपस्थितीत सर्व महिलांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले. दरम्यान यापुढेही आयोजित करण्यात येणाऱ्या लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असेही महापालिकेने आवाहन केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील लसीकरण बंद
दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक 10, 11, 14, 16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सणासुदीच्या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक 10, 11, 14, 16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
कोविड रुग्णालयातून 500 हून अधिक कामगारांना कामावरून काढलं
ठाणे महापालिकेच्या बाळकुंम येथील कोविड रुग्णालयातून 500 हून अधिक कामगारांना 18 ऑगस्ट रोजी अचानक कामावरून काढून टाकण्यात आलंय. त्यानमंतर रुग्णालयाची ही मोगलाई खपवून घेणार नाही. या कामगारांना न्याय दिला नाही तर रुग्णालय चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला होता.
इतर बातम्या :
गब्बरच्या आयुष्यात वादळ, धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट, कारणांची जोरदार चर्चा
Photo : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी आमदार रोहित पवार थेट ट्रॅक्टरवर स्वार
PHOTO | हे आहेत लालबागाच्या राजाचे नवीन दागिने, 4 फूट मूर्तीप्रमाणे केले आहेत तयारhttps://t.co/U5QfAZnPFf#LalbaugchaRaja |#Ornaments |#New |#4FootIdol
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
(Special corona vaccination session in Thane for women who are victims of domestic violence and sexual abuse)