हिंदुत्ववादी संघटनांच्या ठाणे बंदचा फियास्को, परिवहन सेवा बंद; मात्र, रिक्षा सुरू, दुकानेही उघडली

याशिवाय ठाण्यात खासगी वाहतूक सुरू आहे. याशिवाय काही ठिकाणी तुरळक दुकाने सुद्धा सुरू आहेत. तर ठाणे स्टेशन परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत.

हिंदुत्ववादी संघटनांच्या ठाणे बंदचा फियास्को, परिवहन सेवा बंद; मात्र, रिक्षा सुरू, दुकानेही उघडली
हिंदुत्ववादी संघटनेच्या ठाणे बंदचा फियास्को, परिवहन सेवा बंदImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 8:57 AM

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवतांविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ठाणे बंद पुकारण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. सकाळपासून हा बंद सुरू झाला असून या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, रिक्षा सुरू असून काही प्रमाणात खासगी वाहतूकही सुरू आहे. या शिवाय अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाचा या बंदला पाठिंबा असतानाही या बंदचा पुरता फियास्को उडालेला दिसत आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिली होती. त्यातच भाजप आणि शिंदे गटाने या बंदला पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच बंद पुकारण्यात येत असल्याने या बंदकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजचा बंद कडकडीत होईल असं सांगितलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात बंदला ठाणेकरांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात टीएमटीची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. तर दुसरीकडे रिक्षा सुरू असून रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा रिक्षा भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

याशिवाय ठाण्यात खासगी वाहतूक सुरू आहे. याशिवाय काही ठिकाणी तुरळक दुकाने सुद्धा सुरू आहेत. तर ठाणे स्टेशन परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. याशिवाय ठाण्यात अत्यावश्यक सेवाही सुरू आहे. ठाण्यात नागरिकांची नेहमीप्रमाणेच वर्दळ सुरू आहे. त्यामुळे शहरात बंदचं वातावरण कमी प्रमाणात दिसून येत आहे.

दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन बंदची हाक दिली होती. या पत्रकार परिषदेत हिंदुत्ववादी संघटनांनी बंदमागची कारणमिमांसाही स्पष्ट केली होती.

मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला तेव्हा बंद का पुकारला नाही? तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवाल पत्रकारांनी विचारताच या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. या संघटनांच्या प्रतिनिधींनी काहीही उत्तर न देता लगेचच पत्रकार परिषद गुंडाळून काढता पाय घेतला होता.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....