केंद्र सरकारच्या श्रमिक कार्ड योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने ठाण्यात श्रमिकांच्या नोंदणीसाठी उपक्रम

ई-श्रमिक रोजगार योजनचं नामांतर ई - शिव आधार कार्ड योजना असे करून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या श्रमिक कार्ड योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने ठाण्यात श्रमिकांच्या नोंदणीसाठी उपक्रम
शिव आधार
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 8:01 AM

ठाणे: महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधी सह आर्थिक मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील 47 कोटी कामगारां साठी जाहीर केली. मात्र याच ई- श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर करण्यात आलंय. ई-श्रमिक रोजगार योजनचं नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना असे करून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

ई-श्रमिक कार्ड रोजगार योजना

कोरोना काळात लाखो नागरीकांवर उद्योग व्यवसाय बंद पडल्याने बेरोजगार होण्याची वेळ आली. असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र ही योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहोचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी या योजनेचा लाभ आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्या साठी पुढाकार घेतला. त्यांनी या योजनेचे नाव शिव आधार असे करीत सुरुवात केली.

जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न

देवानंद थळे यांच्या उपक्रमाला पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई श्रमिक योजनेचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. या मध्ये नोंदणी झालेल्या कामगारांस अपघाती विमा एक लाख,आरोग्य कुटूंब विमा दोन लाख,बेरोजगार कामगारांना मासिक 1500 रुपये बेरोजगार भत्ता असा लाभ मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खास करून प्रत्येक जिल्हा परिषद गटात शिबिराद्वारे याचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांना मिळवून देण्याचा मनोदय देवानंद थळे यांनी बोलून दाखविला आहे.

ई-श्रम पोर्टल योजना नेमकी काय ?

ई-श्रम पोर्टलच्या मदतीने कामगारांचा डेटा आणि माहिती गोळा केली जाते. मग त्याच आधारावर सरकार कामगारांसाठी योजना आणि नियम बनवेल. योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचेल आणि याची सरकार खात्री करेल. सरकारच्या वतीने, देशातील सर्व कामगारांना ओळखपत्र आणि आधार कार्डच्या धर्तीवर त्यांच्या कामाच्या आधारे श्रेणींमध्ये विभागले जाणार आहे. या आधारावर सरकार कामगारांची नोंद तयार करेल. ई-श्रम पोर्टलवर सुमारे 38 कोटी कामगारांची नोंदणी करण्याची सरकारची तयारी आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगार त्याच दिवसापासून त्यांची नोंदणी सुरू

ई-श्रम पोर्टल सुरू झाल्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगार त्याच दिवसापासून त्यांची नोंदणी सुरू करू शकतात. तुमची संपूर्ण माहिती दिल्यानंतर तुम्ही स्वतःला ई-श्रम पोर्टलशी जोडू शकता. यासाठी कार्यकर्त्याला जन्मतारीख, होम टाऊन, मोबाईल नंबर आणि सामाजिक श्रेणी यासारखी आवश्यक माहिती द्यावी लागेल. याशिवाय आधार कार्ड क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील टाकावा लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात.

इतर बातम्या:

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

बापरे! सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब, नेमकं प्रकरण काय?

Thane Bhiwandi Shivsena promoted e shram scheme as ShivAadhar initiative

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.