धक्कादायक! तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला म्हणत पतीने पत्नीला भोसकले; घटनेनंतर आरोपी फरार

भिवंडीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला भुताने झपाटले आहे, कोणीतरी तिच्यावर जादूटोणा केला आहे, त्यामुळे ती आपल्याला त्रास देते असा पतीचा समज झाला होता. याच गैरसमजातून पतीने पत्नीला घरातील भाजी कापण्याच्या चाकून भोसकले.

धक्कादायक! तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला म्हणत पतीने पत्नीला भोसकले; घटनेनंतर आरोपी फरार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 8:15 AM

ठाणे : भिवंडीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला भुताने झपाटले आहे, कोणीतरी तिच्यावर जादूटोणा केला आहे, त्यामुळे ती आपल्याला त्रास देते असा पतीचा समज झाला होता. याच गैरसमजातून पतीने पत्नीला घरातील भाजी कापण्याच्या चाकून भोसकले. या हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आरोपी पतीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इरफान शेख असे या आरोपीचे नाव आहे.

राग अनावर झाल्याने हल्ला

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, इरफान शेख हा आपली पत्नी कुरेशा यांच्यासोबत भोईवाडा येथील कारीवली गावच्या चाळीत राहातो. इरफानला दारूचे व्यसन होते. तो घरी दारू पिऊन आला आणि पत्नीसोबत वाद घालू लागला. तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला असून, त्यामुळेच तू मला त्रास देते असे तो दारूच्या नशेत बोलत होता. याचदरम्यान त्याने पत्नीला मारण्यासाठी हात उचलला, पत्नी कुरेशा यांनी त्याचा हात धरला. हात धरल्याने इरफानला राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने घरात भाजी कापण्यासाठी ठेवलेल्या चाकून आपल्या पत्नीवर वार केले.

फरार आरोपीचा शोध सुरू

या घटनेत पत्नी कुरेशा या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान या प्रकरणात आरोपी पती इरफान शेख यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आपरोपीचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Nagpur Crime | आभासी जगात वावरू नका! फेसबूक फेंडने फसविले; आधी बलात्कार नंतर गर्भपात…

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या

Kalyan Crime: वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण, कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.