TMC Commissioner : कोपरी परिसरातील विविध विकासकामांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी विभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाकांक्षी असा प्रकल्प सुरू आहे. या कामामध्ये काही निवासी घरे व दुकाने यामुळे कामास विलंब होत आहे. या प्रकल्पात होणाऱ्या बाधित होणाऱ्या नागरिकांचे तातडीने पुनवर्सन करुन हे काम अधिक गतीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिले.

TMC Commissioner : कोपरी परिसरातील विविध विकासकामांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
कोपरी परिसरातील विविध विकासकामांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:39 AM

ठाणे : शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांचा पाहणी (Inspections) दौरा सुरूच असून सोमवारी कोपरी परिसरातील ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्प, कोपरी स्मशानभूमी तसेच इतर ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. दरम्यान सर्व अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सॅटिसच्या कामामध्ये बाधित होणारी घरे व दुकाने यांचे तातडीने पुनर्वसन करून काम अधिक गतीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिले. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मनिष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, संबंधित कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी आदी उपस्थित होते. (Thane Municipal Commissioner inspected various development works in Kopari area)

स्मार्ट सिटीचे काम गतीने करण्याचे आदेश

ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी विभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाकांक्षी असा प्रकल्प सुरू आहे. या कामामध्ये काही निवासी घरे व दुकाने यामुळे कामास विलंब होत आहे. या प्रकल्पात होणाऱ्या बाधित होणाऱ्या नागरिकांचे तातडीने पुनवर्सन करुन हे काम अधिक गतीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोपरी मलप्रक्रिया केंद्र स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर तलावाची अधिकाऱ्यांसमवेत देखील पाहणी केली. कोपरी परिसरातील या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, फुटपाथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन केंद्रालाही दिली भेट

ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रदूषण नियंत्रण कक्ष व समर्थ भारत व्यासपीठ संचलित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन केंद्राला देखील महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सोमवारी भेट दिली. हरित कचऱ्यापासून जळावू इंधन, निर्माल्यापासून खत निर्मिती व सुका कचरा वर्गीकरण केंद्र असे तीन प्रकल्प या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन केंद्रात सुरु आहेत. या प्रकल्पात दररोज जवळपास तीस टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. दहा टन हरित कचरा सहा टन निर्माल्य व 14 टन सुका कचरा यांची शास्त्रोक्त विल्हेवाट या प्रकल्पात करण्यात येते. या प्रकल्पामुळे कचरावेचक महिलांना रोजगार प्राप्त होत असून जवळपास एक लाख नागरिक आपल्या घरातील सुका कचरा शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी या प्रकल्पात पाठवितात. लोकसहभागातून घनकचरा व्यवस्थापनाचे केंद्र म्हणून या प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी यावेळी संबंधितांना दिले. (Thane Municipal Commissioner inspected various development works in Kopari area)

इतर बातम्या

Ganja Smuggling : गांजा तस्करी प्रकरणी पुन्हा शिरपूर पोलिसांच्या रडावर, तीन जणांना अटक

Suicide | सततच्या आजारपणाचा वैताग, अंबरनाथमध्ये ज्येष्ठ नागरिकाचं टोकाचं पाऊल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.