AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुटपाथवरील अतिक्रमणे हटवा, चेंबर्सवर झाकणे बसवा, ठाणे महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आनंदनगर येथून सकाळी अकरा वाजता सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली (Thane Municipal Commissioner Vipin Sharma Inspection in city over rain alert).

फुटपाथवरील अतिक्रमणे हटवा, चेंबर्सवर झाकणे बसवा, ठाणे महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडले, ठाण्याच्या महापालिका आयुक्तांचा अचानक पाहणी दौरा
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 8:06 PM
Share

ठाणे : मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा वेग सध्या मंदावला आहे. पण सकाळी पाऊस जोरात सुरु होता. ठाण्यात दोन दिवसांपासून भरपूर पाऊस पडतोय. तसेच हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय काही भागांमध्ये इणारतीचे संरक्षण भिंत कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सकाळी 11 वाजता अचानक शहरातील सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केली (Thane Municipal Commissioner Vipin Sharma Inspection in city over rain alert).

महापालिका आयुक्तांकडून शहरातील अनेक कामांची पाहणी

महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आनंदनगर येथून सकाळी अकरा वाजता सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, कोव्हीड-१९ समन्वयक महेश राजदेरकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी आनंदनगर, तीन हात नाका, आरटीआय ऑफिस, श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, उपवन रोड, उपवन तलाव, वर्तकनगर नाका, नितीन कंपनी आदी परिसरातील साफसफाई, रंगरंगोटी, चेंबर्सवरील झाकणे तसेच फुटपाथ दुरुस्ती कामाची पाहणी केली (Thane Municipal Commissioner Vipin Sharma Inspection in city over rain alert).

आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

अतिवृष्टीमुळे शहरात रस्त्यावर वाहून आलेला कचरा आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलणे, फुटपाथवरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्यासोबतच पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या इतर उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. तसेच ज्या ठिकाणी चेंबर्सवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ चेंबर्सची झाकणे बसविण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.

शहर सौंदर्यीकरणांतर्गत भिंती, चौक, रस्ते दुभाजक, गार्डन्स तसेच फ्लायओव्हरवर रंगरंगोटी करून शहर सुंदर बनवण्याचे काम सुरु आहे. ही सर्व कामे अजून प्रभावीपणे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळ्यात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी साफसफाई, औषध फवारणी, इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

मेट्रोच्या कामांची पाहणी

महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आजच्या पाहणी दौऱ्यात सर्व ठिकाणाच्या मेट्रोच्या कामांची पाहणी केली. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी बॅरिकेटिंगमुळे पाणी साचण्याची शक्यता असल्याने पाणी अडणार नाही यासाठी बॅरिकेटिंगची उंची वाढविण्याच्या सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

घराबाहेर पडू नका, आयुक्तांच्या सर्वसामान्यांना सूचना

दरम्यान 13 मे पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब तसेच रस्त्यावरील झाडांपासून दूर राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले.

संबंधित बातमी : मुंबई आणि कोकणात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याचा रेड अलर्ट

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.