Thane : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज, कोविड हॉस्पिटलमधील सुविधांची आयुक्तांनी केली पाहणी
पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे यापूर्वी व्हेंटिलेटरसहित 206 आयसीयू बेड्स आणि 883 ऑक्सिजन बेडस कार्यान्वित आहेत. यामध्ये कोविडग्रस्त लहान मुलांसाठी सुसज्ज असे 50 पेडियाट्रिक आयसीयू आणि 50 पेडियाट्रिक ऑक्सिजन बेड्सची उभारणी करण्यात आली आहे.
ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका(Thane Corporation) प्रशासन सज्ज झाले आहे. वाढती रुग्णसंख्या वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल(Covid Hospital) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 50 पेडियाट्रिक आयसीयू आणि 50 पेडियाट्रिक ऑक्सिजन बेड्स सुविधांची सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. आरोग्य सुविधांमध्ये कुठलीही कमतरता राहू नये यासाठी पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. शहरातील कोविडग्रस्त लहान मुलांना अत्यावश्यक औषधोपचार तात्काळ मिळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये येथे पेडियाट्रिक बेड्सची उपलब्धता करण्यात आली आहे. (Thane Municipal Corporation is ready to face the third wave, The Commissioner inspected the Covid Hospital)
या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, उप आयुक्त मनिष जोशी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, कार्यकारी अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर, डॉ. रोहित महावरकर, समन्वयक आधार कुलकर्णी आदी उपस्थित होते. कोरोनाची वाढती तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याकडे व त्यादृष्टीने आरोग्य सुविधा निर्मिती करण्याकडे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा बारकाईने लक्ष देत आहेत.
लहान मुलांच्या उपचाराची विशेष खबरदारी
ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर लहान मुलांसाठी पेडियाट्रिक आयसीयू कक्ष निर्माण करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार या कक्षाची स्थापत्य, विद्युत आणि ऑक्सिजन सुविधेसह इतर सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पार्किंग प्लाझा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे यापूर्वी व्हेंटिलेटरसहित 206 आयसीयू बेड्स आणि 883 ऑक्सिजन बेडस कार्यान्वित आहेत. यामध्ये कोविडग्रस्त लहान मुलांसाठी सुसज्ज असे 50 पेडियाट्रिक आयसीयू आणि 50 पेडियाट्रिक ऑक्सिजन बेड्सची उभारणी करण्यात आली आहे. तसेच स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी विशेष कक्ष व मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया तयार करण्यात आला आहे.
रुग्णालय परिसरात 13 किलोलिटरच्या दोन टाक्या कार्यान्वित
रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून रुग्णालय परिसरात 13 किलोलिटरच्या दोन मोठ्या प्राणवायूचा टाक्या कार्यान्वित आहेत. त्या सोबतच प्रतिदिन अतिरिक्त 5 मेट्रिक टन इतका प्राणवायू वातावरणातील हवेतून तयार करता येईल असे 3 पीएसए प्रकल्प कार्यान्वित आहे. या ठिकाणी रुग्णांना सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी रक्त तपासणी, एक्सरे, औषधे या सर्व सुविधा तसेच तज्ज्ञ वैद्यकीय पथक आणि प्रशासकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे हृदयरोग संबंधित रुग्ण तसेच आर्थोपेडिक रुग्णांसाठी 6 आयसीयू व 6 आयसोलेशन बेडस सुविधा निर्माण करण्यात आली आहे. (Thane Municipal Corporation is ready to face the third wave, The Commissioner inspected the Covid Hospital)
इतर बातम्या
Kalyan Crime : हौसेला मोल नाही; केवळ महागड्या वस्तूंसाठी केडीएमसी कर्मचार्याची पत्नी बनली चोर