Thane Hospital : धक्कादायक… बाळाचा मृतदेह घेऊन बाप चक्क रुग्णालयातून पळाला; हॉस्पिटलमध्ये असं काय घडलं?

ठाण्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात 18 रुग्णांचा एकाच रात्री मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता या रुग्णालयात आणखी एक घटना घडली आहे. घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले होते.

Thane Hospital : धक्कादायक... बाळाचा मृतदेह घेऊन बाप चक्क रुग्णालयातून पळाला; हॉस्पिटलमध्ये असं काय घडलं?
chhatrapati shivaji maharaj hospital Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 2:22 PM

ठाणे | 15 सप्टेंबर 2023 : ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात महिन्याभरापूर्वी एकाच रात्री 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावरून मनसे आणि राष्ट्रवादीने रुग्णालयात येऊन जोरदार आंदोलन केलं होतं. त्यानंतर मंत्र्यांच्या बैठकीतही या घटनेचे पडसाद उमटले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारल्याचीही चर्चा होती. आता त्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. अर्थात त्या घटनेचा हॉस्पिटल प्रशासनाचा काहीच संबंध नाही. मात्र, या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या बाळाचं शवविच्छेदन करू नये म्हणून बापाने चक्क मुलाचा मृतदेह घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री 10: 30 च्या दरम्यान या 8 महिन्याच्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने आज पहाटे उपचारा दरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते, त्यावेळी त्याला निमोनिया लक्षण होते. या बाळाने कफ सिरपचे ओव्हर डोसही घेतल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई

बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर बाळाच्या बापाने विरोध केला आणि आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन सरळ पसार झाला. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालयाकडून तत्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून या व्यक्तीला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणले. या बाळाचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नातेवाईकांना थांबवले

एका 8 महिन्याच्या बाळाला भर रुग्णालयातून घेऊन जात असताना रुग्णालयाची सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयन्त केला. मात्र रिक्षातून बाळाला हा व्यक्ती पसार झाला. मात्र त्याच्या नातेवाईकांना सुरक्षा रक्षकांनी थांबवून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करून त्यांच्याकडून या व्यक्तिचा पत्ता घेतला आमि त्याचा शोध घेतला.

अहवाल गुलदस्त्यात

एक महिन्या पूर्वी याच पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊन जोरदार निदर्शने केली होती. त्याचा चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.