Thane Police Website Hacked : “भारतीयांनो, तातडीने जगभरातील मुस्लिमांची माफी मागा”, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवरून इशारा

Thane Police Website Hacked : ठाणे पोलिसांची हॅक करण्यात आली होती. आज पहाटे 4 वाजता साईड हॅक झाली होती. 8 तास साईड बंद होती. ठाणे पोलिसांची हॅक केलेली ठाणे पोलिस वेब साईड पूर्व पदावर झाली आहे.

Thane Police Website Hacked : भारतीयांनो, तातडीने जगभरातील मुस्लिमांची माफी मागा, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवरून इशारा
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 12:52 PM

ठाणे : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भारतातही त्याच्या निषेधार्ह आंदोलनं करण्यात आली. पण सध्या ठाणे पोलीसांच्या वेबसाईवरचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यात “जगभरातील मुस्लिमांची” माफी मागावी असा मजकूर पाहायला मिळतोय. पण हे सगळं ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची वेबसाइटवर पाहायला मिळत असलं तरी हो पोलिसांच्या वतीने हा संदेश देण्यात आलेला नाही. तर ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक (Thane Police Website Hacked) केली गेली. अन् त्यावरून हा मेसेज देण्यात आला. पण सध्या ही वेबसाईट पुन्हा पुर्ववत झाली आहे.

ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक

ठाणे पोलिसांची हॅक करण्यात आली होती. आज पहाटे 4 वाजता साईड हॅक झाली होती. 8 तास साईड बंद होती. ठाणे पोलिसांची हॅक केलेली ठाणे पोलिस वेब साईड पूर्व पदावर झाली आहे. डेटा सेव्ह असून रिकव्हर झाला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईट हॅक कशी झाली, कुणी केली, याबाबत ठाणे पोलिस पुढील तपास करत आहे.

व्हायरल मेसेज

“सर्व भारतीयांना नमस्कार… तुम्ही पुन्हा पुन्हा इस्लामिक धर्माविषयी द्वेष पसरवत आहात. धर्माला अडचणीत आणत आहात. आमच्या धर्माचा, धर्मगुरूचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही सर्वांनी त्वरित जगभरातील मुस्लिमांची माफी मागा! आमच्या प्रेषिताचा अपमान झाला आहे. आता आम्ही शांत बसणार नाही”, असं संदेशात ठाणे पोलिसांच्या साईटवरून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध

टीव्हीवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. हा वाद चिघळू नये, या विचाराने भाजपने शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, असे असतानाही शर्मा यांच्याविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. काही अतिरेक्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन खासदार इम्तियाज जलील यांनी शर्मा यांना फाशी देण्याची मागणी केली होती.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.