Bhiwandi Accident : भिवंडीत झोपड्यावर ट्रक कोसळून तीन बहिणींचा मृत्यू, टेंभवली गावातील वीटभट्टीवरील घटना

कोळसा खाली करत असतानाच कंटेनरचा शॉकअल तुटल्याने ट्रॉलीसहीत कोळसा झोपडीवर कोसळला. या दुर्घटनेत झोपेत असलेल्या वळवी यांच्या तीन मुली जागीच ठार झाल्या तर वळवी पती-पत्नी आणि मुलाला वाचवण्यात स्थानिक मजुरांना यश आले आहे.

Bhiwandi Accident : भिवंडीत झोपड्यावर ट्रक कोसळून तीन बहिणींचा मृत्यू, टेंभवली गावातील वीटभट्टीवरील घटना
भिवंडीत झोपड्यावर ट्रक कोसळून तीन बहिणींचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 1:00 AM

भिवंडी : विटभट्टीवर कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली(Truck Trolly) झोपडीवर कोसळल्याने तीन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास भिवंडीत घडली आहे. भिवंडी तालुक्यातील टेंभवली गावच्या हद्दीतील वीटभट्टी(Brick Kiln)वरील हृदयद्रावक घटना आहे. कंटेनरमधून कोळसा खाली करत असताना कंटेनरचा शॉकअल अचानक तुटला आणि कोळशाने भरलेली ट्रॉली मजुरांच्या झोपडीवर कोसळली. या तिन्ही चिमुकल्या झोपडीत झोपलेल्या असतानाच अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातला. लावण्या(7), अमिषा (6) आणि प्रीती (3) अशी अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेमुळे वीटभट्टी मजूर बाळाराम वळवी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. (Three sisters killed in truck crash in Bhiwandi, Incident at the brick kiln in Tembhavali village)

कंटेनरमधून कोळसा खाली करताना अपघात घडला

बाळाराम वळवी हे भिवंडीतील टेंभवली गावातील वीटभट्टीवर एका झोपड्यात आपल्या कुटुंबासोबत राहतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा वळवी यांच्या झोपडीजवळ ट्रकमधून खाली करण्यात येत होता. यावेळी वळी यांची पत्नी जेवण करीत होती तर चार मुले झोपली होती. कोळसा खाली करत असतानाच कंटेनरचा शॉकअल तुटल्याने ट्रॉलीसहीत कोळसा झोपडीवर कोसळला. या दुर्घटनेत झोपेत असलेल्या वळवी यांच्या तीन मुली जागीच ठार झाल्या तर वळवी पती-पत्नी आणि मुलाला वाचवण्यात स्थानिक मजुरांना यश आले आहे. याप्रकरणी भिवंडी अधिक तपास करीत आहेत.

पुण्यातील कात्रज परिसरात भीषण अपघातात एक जण ठार

पुण्यातील कात्रज परिसरात तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृताची ओळख अद्याप पटू शकली नाही. कात्रजच्या नवीन बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर जांभूळवाडी दरीपुलाजवळ कंटेनरची कारमध्ये धडक झाली. यानंतर कंटेनरने बाजूने जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर कंटेनरचालकाने कंटेनरसह घटनास्थळावरुन पळ काढला. अपघातात कार आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अपघात नेमका कसा घडला हे अद्याप कळू शकले नाही. (Three sisters killed in truck crash in Bhiwandi, Incident at the brick kiln in Tembhavali village)

इतर बातम्या

Bandra : वांद्र्यात चार मजली घर कोसळलं, सात जणांना रेस्क्यू करण्यात यश

Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखेकडून सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, सात आरोपींना अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.