मुंब्र्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन, पण तरीही उद्धव ठाकरेंची मनातली इच्छा अपूर्णच राहिली

शिवसेनेच्या 40 वर्षांपासूनची मुंब्र्यातील शाखा गेल्या आठवड्यात अतिक्रमणाच्या आरोपाखाली पाडण्यात आली. या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वत: आज मुंब्र्यात आले. उद्धव ठाकरेंनी या शाखेजवळ जाण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. पण उद्धव ठाकरे यांना 10 मीटर लांबूनच या शाखेच्या जागेची पाहणी करता आली. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. पण उद्धव ठाकरेंनी त्यावरुन सत्ताधारी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

मुंब्र्यात प्रचंड शक्तीप्रदर्शन, पण तरीही उद्धव ठाकरेंची मनातली इच्छा अपूर्णच राहिली
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 8:36 PM

ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा न भूतो, न भविष्य असा संघर्ष आज ऑन कॅमेरा बघायला मिळाला. ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आज पहिल्यांदाच समोरासमोर आले. अर्थात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिसांनी प्रचंड तयारी केली होती. मुंब्र्यात आज तब्बल 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात होते. त्यामुळे संपूर्ण मुंब्रा शहराला छावणीचं स्वरुप आलेलं बघायला मिळालं. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मुंब्र्यात आले होते. या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये 20 फुटाचं अंतर पोलिसांनी ठेवलेलं होतं. दोन्ही गटाच्या बाजूने एकमेकांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. याच शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात दाखल झाले.

उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यात आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते या शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे स्वत: मुंब्र्याला आल्यामुळे या घटनेला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. त्यामागील कारणही अगदी तसंच होतं. गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा अतिक्रमणचा आरोपाखाली पाडण्यात आली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले. शाखा पाडल्यानंतरच उद्धव ठाकरेंनी आपण मुंब्र्याला शाखेची पाहणी करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार असल्याचं ठरलं होतं.

शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखेबाहेर ठाण मांडून

उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार म्हणून ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स शहरात लावण्यात आले होते. पण रात्री उशिरा काही अज्ञातांनी ते बॅनर फाडले. शिंदे गटाकडून संबंधित शाखा ही आपली असल्याचा दावा करण्यात आला. तसेच उद्धव ठाकरे शाखेची पाहणी करायला आले तर आम्ही त्यांना विरोध करु, अशी भूमिका मांडण्यात आली. विशेष म्हणजे शिंदे गटाचे कार्यकर्ते आज दुपारपासून शाखेच्या बाहेर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे पोलिसांपुढील आव्हान वाढलं होतं.

पोलिसांची नोटीस, मग नंतर नोटीस रद्द

उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील दबाव वाढताना दिसत होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना शाखा परिसरात येण्यास मनाई केली. पण उद्धव ठाकरे मुंब्रा दौऱ्यासाठी येणारच होते. यानंतर पोलिसांनी उद्धन ठाकरेंना कमल 144 ची नोटीस बजावली. पण या मुद्द्यावरुन चर्चांना उधाण आल्यानंतर त्यांनी ही नोटीस मागे घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुंब्र्यात दाखल झाले.

ठाकरे गटाचं जंगी शक्तिप्रदर्शन

ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड स्वत: ठाकरेंच्या स्वागताला आले होते. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करत होते. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षावर करुन त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे शाखेच्या जवळ गेले.

तरीही 10 मीटरचं अंतर अपुरच राहिलं

उद्धव ठाकरे पाडलेल्या शाखेच्या पाहणीसाठी पुढे सरकत होते. पोलिसांच्या फौजफाट्यासह त्यांची गाडी पुढे सरकत होती. पण शाखेच्या 10 मीटर अंतरावर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत उद्धव ठाकरे यांना पुढे जाता येणार नाही, असं सांगितलं. यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: पोलिसांची समजूत काढण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण पोलीस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे 10 मीटर लांबूनच उद्धव ठाकरे यांना शाखेची पाहणी करावी लागली आणि परतावं लागलं.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.